या अभिनेत्रीचा महिन्याचा खर्च फक्त 2000 रुपये, पण कसं काय? ,म्हणाली “गेल्या पाच वर्षात…”

या अभिनेत्रीचा महिन्याचा खर्च फक्त 2000 रुपये, पण कसं काय? ,म्हणाली “गेल्या पाच वर्षात…”

बॉलिवूड असो किंवा मराठी इंडस्ट्रीत सर्वच कलाकारांना आपलं ग्लॅमर जपण्यासाठी मेहनतही घ्यावीच लागते. अभियासोबतच आपली पर्सनॅलिटीही तेवढीच आकर्षक ठेवावी लागते. आणि अर्थात त्यात खर्च तर अमाप होतोच. कारण कलाकारांना त्यांच्या कपड्यापासून ते डाएटपर्यंत सर्वांवरच लक्ष द्यावं लागत. त्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र अशी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे जिचा महिन्याचा खाण्यापिण्याचा खर्च हा केवळ 2000  आणि वर्षाचा खर्च 20000 असल्याचं तिने म्हटलं आहे.

या अभिनेत्रीने बऱ्याच मालिका आणि चित्रपट केले आहेत. तिचा एक चित्रपट नुकताच रिलीज झाला ती अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. पण मृण्मयी देशपांडे फक्त तिच्या चित्रपटामुळेच नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे, कारण अनेकांना हे माहित नसेल की मृण्मयी देशपांडे तिच्या नवऱ्यासोबत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महाबळेश्वर येथे राहत आहे.

शहराकडून गावाकडे जाण्याचा निर्णय

शहराकडून गावाकडे जाण्याचा निर्णय हा तिचा नवरा स्वप्नील राव यांचा होता. मृण्मयीने त्याच्या कल्पनेला फक्त साथ दिली आहे. नुकत्याच एका झालेल्या मुलाखतीत मृण्मयी आणि स्वप्नीलने त्यांचे गावाकडील आयुष्य घडवण्यापासून ते जगण्यापर्यंत सगळ्या गोष्टींबद्दलचे अनुभव शेअर केला आहे. या जोडीने अनेक फळभाज्यांची लागवड केली आहे.

त्यांनी त्यांच्या शेती विषयी माहिती देत एकाचवेळी ते विविध प्रकारची उत्पादने घेत असल्याचे म्हटलं. स्ट्रॉबेरीसह विविध इतर फळे, फळभाज्या, कांदा, झेंडू, माठ, लसून, मिरची अशी विविध उत्पादने ते घेत असल्याचे या जोडीने सांगितले. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरूवात केली आहे. याबरोबरच स्वप्नील वर्कशॉप घेत असल्याचे म्हटलं.

2000 रुपयांतही महिना आम्ही आनंदात जगतो

दरम्यान या शहरातून गावाकडे आल्याने त्यांच्या लाइफस्टाइलमध्ये आणि गरजांमध्ये बराच फरक दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितलं. एवढंच नाही तर त्यांचा महिन्यच्या खर्चामध्येही फरक पडला असल्याचं त्यांनी म्हटलं. याबद्दल मृण्मयीने सांगितले की, “शेतामध्ये आल्यानंतर आमचा जो आठवड्याचा खर्च आहे, तो जवळजवळ 500-600 रुपये आहे.

2000 रुपयांतही आम्ही महिना अगदी आनंदात जगतो. गेल्या पाच वर्षांत मला आठवत नाही की, मी वारंवार कपडे विकत घेतले. माझा वर्षाचा कपड्यांचा खर्च जवळजवळ 20 हजार रुपये असेल. माझ्या प्रोफेशनच्या मानाने हा खर्च नगण्य आहे. त्याव्यतिरिक्त मला काही लागतच नाही”, असं म्हणत अभिनेत्रीने तिचा महिन्याचा खर्च सांगितला.

महाबळेश्वर येथे सुंदर घर आहे

महाबळेश्वर येथे मृण्मयी व तिच्या पतीने सुंदर घरही बांधले आहे. घराच्या आजूबाजूला त्यांची शेतजमीन आहे. या शेतातील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. शेतात सध्या काय काम सुरू आहे, कोणत्या पिकाचे उत्पन्न घेतले जाणार आहे, याबद्दलही ती अनेकदा माहिती देते. मृण्मयी तिच्या पतीसह शेतात पिकांच्याबाबतीत विविध प्रयोग करताना दिसते. तिने कोंबड्यादेखील पाळल्या असून, त्यांना त्यांच्या शेतात गाय हवी असल्याचेदेखील या जोडप्याने म्हटले आहे.

मृण्मयी आणि गौतमीचे व्हिडीओ 

मृण्मयी देशपांडे आणि तिची बहिण गौतमी देशपांडे या बहिणी त्यांचे मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. या बहिणींचा ही मजामस्ती आणि त्यांच्यातील प्रेम-भांडण पाहायला सर्वांनाच आवडतं. नेटकरीही त्यांच्या या व्हिडीओला नेहमी पसंती दर्शवतात. दरम्यान मृण्मयी देशपांडे नुकतीच ‘एक राधा एक मीरा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह अभिनेता गश्मीर महाजनी व सुरभी भोसले यांनी देखील प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून…’; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला ‘आम्ही सगळे मिठाई देऊन थकलो तुमच्यापासून…’; रामदास कदमांचा राऊतांना खोचक टोला
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा...
तटरक्षक दलात 300 पदांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
रणवीर अलाहाबादिया मुंबई पोलिसांसमोर हजर, दोन तास चालली चौकशी
साहित्य संमेलनात बोलताना प्रत्येकाने मर्यादा ठेवल्या पाहिजेत – देवेंद्र फडणवीस
महाकुंभमधून परतल्यानंतर अनेकांना त्वचेचे आजार, फंगल इन्फेक्शन झाल्याची डॉक्टरांची माहिती
महायुतीत महागोंधळ! फिक्सरच्या नावांना मान्यता देणार नाही! कोकाटेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचा सिक्सर
एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित