संमेलनाच्या मंचावर राजकारणी का? महादजी शिंदे स्वाभिमानी माणूस; हा पुरस्कार एकनाथ शिंदेंना कसा? विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अशोक राणा यांचा हल्ला
दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलावले. ते प्रधानमंत्री नाहीत तर आरएसएसचे प्रचारमंत्री आणि अदानी-अंबानींचे दिवाणजी असल्याची गंभीर टीका विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. अशोक राणा यांनी केली. तसेच महादजी शिंदे हा स्वाभिमानी माणूस होता. त्यांच्या नावाचा पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कसा? असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.
नवी दिल्ली येथे पार सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्शाभूमीवर समांतर, पण वेगळे असे विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू आहे. रविवारी संमेलनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस होता. डॉ. अशोक राणा हे या 19 व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.
मोदी आरएसएसचे प्रधानमंत्री, अदानी-अंबानींचे दिवाणजी
डॉ. राणा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, मुळात हे प्रधानमंत्री नाहीत. ते प्रचारमंत्री आहेत. ते आरएसएसचे प्रधानमंत्री आहेत. ते भाजप पक्षाचे, अदानी-अंबानींचे प्रधानमंत्री आहेत. ते सर्वसामान्य माणसांचे प्रधानमंत्री नाहीत. भारताचे तर मुळीच नाही. कारण ते भारतात कमी राहतात आणि परदेशात जास्त फिरतात. जेव्हा जेव्हा बाहेर देशात फिरतात तेव्हा आपले जे मालक आहेत अदानी-अंबानी यांचे औद्योगिक व्यवहार, आर्थिक व्यवहार ते सांभाळतात. त्यामुळे ते एक प्रकारे त्यांच्या दिवाणजीचे काम करतात. त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करता येत नाही.
भाजपचा प्रचार सुरू आहे
डॉ. अशोक राणा म्हणाले की, राजकारणी लोकांनी स्वत:च नम्रतेने साहित्याच्या मंचावर जाणे टाळले पाहिजे. त्यांना सन्मानाने समोरच्या जागेत बसता येते, परंतु त्यांचा हव्यास, हट्ट किंवा दुराग्रह असतो की आम्ही तुम्हाला मदत करतो तर विचारपीठावर मिरवणे हा आमचा हक्क आहे. राजकारणी लोकांना टाळू नये असे म्हणणारा एक मोठा वर्ग आहे. दिल्लीच्या संमेलनात त्यांनी पराकोटी केली की प्रधानमंत्री, आरएसएसला तिथे आणले. भारतीय जनता पक्षाचा प्रचार त्या ठिकाणी सुरू आहे.
शिंदेंवरही विषप्रयोग होणार
‘एकनाथ शिंदे यांना स्वाभिमानी महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार देणे हा तर विकृतीचा कळस आहे. महादजी यांना विष देऊन मारण्यात आले. आता त्यांच्या नावे पुरस्कार शिंदेंना दिला असेल तर त्यांचा शेवट कसा होईल हे स्पष्ट होते. महादजींचा पराक्रम एकनाथ शिंदेंमध्ये कुठेच दिसत नाही. पण त्यांच्यावर विषप्रयोग होईल हे पुरस्कारातून सूचित होते, असे मला वाटते,’ असे अशोक राणा म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List