सैफ हल्ल्यानंतर रिक्षातून का गेला रुग्णालयात? ‘त्या’ रात्रीची परिस्थिती सांगत म्हणाला…
Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर त्यांच्या दोन मुलांसोबत रॉयल आयुष्य जगतात. सोशल मीडियावर त्यांच्या रॉयल लाईफस्टाईलचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांच्या आलिशान बंगले, महागड्या गाड्या, लाईफस्टाईलच्या चर्चा रंगलेल्या असतात. पण 16 जानेवारी रोजी जेव्हा सैफवर प्राणघातक हल्ला झाला तेव्हा अभिनेता रिक्षातून रुग्णालयात का गेला? अभिनेत्याचा ड्रायव्हर कुठे होता? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले.
यावर आता खुद्द सैफ अली खान याने मौन सोडलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याची चर्चा रंगली आहे. हल्लेखोराने प्राणघातक हल्ला केल्यानंतर सैफ अली खान याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
नुकताच झालेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, ‘पूर्ण रात्र घरी कोणी थांबत नाही. सर्वांना स्वतःच्या घरी, कुटुंबासोबत वेळ व्यतीत करायचा असतो. आमच्या घरात काही लोकं राहतात. पण ड्रायव्हर राहत नाही. काही महत्त्वाचं काम असेल, किंवा रात्री कुठे जायचं असेल तरच ड्राव्हरला घरी राहण्यासाठी आम्ही सांगतो…’
‘तेव्हा मी स्वतः देखील गाडी चालवली असती, जर मला गाडीची चावी मिळाली असती. ड्रायव्हरला यायला फार उशीर झाला असता. म्हणून रिक्षातून रुग्णालयात पोहोचलो…’ असं सैफ अली खान म्हणाला. सध्या सर्वत्र सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.
सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला
16 जानेवारी रोजी सैफ अली खान याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला. व्यक्ती जेहच्या बेडकडे जात असल्याचं लक्षात येताच, घरातील मदतनीस महिलेने आरडाओरड सुरु केली. तेव्हा करीना आणि सैफ मुलगा सैफच्या खोलीकडे धावत आले. तेव्हा सैफ आणि हल्लेखोर यांच्यात झालेल्या हाणामारीत सैफ गंभीर जखमी झाला.
हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. ज्यामुळे चाकूचा तुकडा सैफच्या मणक्यात घुसला. अशात शस्त्रक्रिया कडून अभिनेत्याच्या मणक्यातील चाकूचा तुकडा काढण्यात आला. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. शिवाय सैफने आता कामाला देखील सुरुवात केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List