व्हॅलेंटाईन डेच्या आधी टायगर श्रॉफने व्यक्त केलं अनोखं प्रेम; शेअर केला व्हिडिओ

व्हॅलेंटाईन डेच्या आधी टायगर श्रॉफने व्यक्त केलं अनोखं प्रेम; शेअर केला व्हिडिओ

टायगर श्रॉफ हा एक फिटनेस स्टार आहे, जो तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहतो आहे. दिशा पटानीसोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच होत असतात.

टायगरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान टायगरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीला दिलेल्या कॅप्शनमध्ये “फक्त कारण मी तुझ्यावर प्रेम करतो….” त्याने असं लिहिल्याने तर हा व्हिडीओ अधिकच व्हायरल होत आहे.

ट्रेनरसोबत स्टंट करताना दिसत आहे

या व्हिडीओमध्ये टायगर त्याच्या ट्रेनरसोबत स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये, टायगरने जीन्ससह स्लीव्हलेस हूडी घातली आहे. तसेत त्यांने त्याचा चेहराही कव्हर केला आहे. व्हिडीओमध्ये त्याचा ट्रेनर सिगारेट ओढताना दिसत आहे आणि समोरून टायगर येतो आणि तो पायाने स्टंट करत ती सिगारेट खाली पाडतो.  हाताने नाही म्हणत ही सवय चांगली नसल्याचा इशारा देतो. एकंदरीतच टायगरने सिगारेट ओढणं आरोग्यासाठी हानिकारक असून ती न ओढण्याचा आणि आपलं आरोग्य फिट ठेवण्याचा संदेश दिला आहे.

‘आय लव्ह यू’ गाण्यासह संदेश 

या व्हिडिओला टायगरने सलमान खान आणि करीना कपूर स्टारर ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील ‘आय लव्ह यू’ हे गाणे जोडले आहे. तसेच “फक्त याच कारण मी तुझ्यावर प्रेम करतो नदीम’ असं त्याने कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. सध्या त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांनी व्हिडीओवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

‘बागी 4’ मधून पदार्पण लवकरच पदार्पण

टायगर लवकरच अ‍ॅक्शनने भरलेल्या ‘बागी 4’ च्या फ्रँचायझीमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनम बाजवा आणि हरनाज संधू यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ए. हर्ष दिग्दर्शित ‘बागी 4’ यावर्षी 5 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली साजिद नाडियाडवाला यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. माजी मिस युनिव्हर्स हरनाज संधू या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’वर शरद पवार थेट बोलले; उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकित
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं...
‘छावा’ सिनेमामुळे निर्मात्यांना झालेल्या फायद्याचा आकडा ऐकलात का? ‘पुष्पा २’च्या निर्मात्यांना देखील टाकले मागे
संजय राऊत यांच्याशी मी सहमत, नीलम गोऱ्हे यांचे विधान मूर्खपणाचे; शरद पवार यांची टीका
चंद्रपुरात ओबीसीकडून निषेध आंदोलन, सरकारच्या निर्णयाचा विरोध
नांदेडमध्ये दिवसाढवळ्या दोघांवर गोळीबार, एकाची हत्या; मुख्य आरोपीला पंजाबमधून अटक
महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं वक्तव्य
Champions Trophy 2025 – रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या फिटनेसची चाहत्यांना चिंता, श्रेयस अय्यरने दिली महत्त्वाची अपडेट