Salman Khan: 45 मिनिटं सर्वांचा श्वास रोखला, विमानात पसरला सन्नाटा, सलमान खानचा मृत्यूशी जेव्हा झाला सामना
अभिनेता सलमान खान मुलाखती दरम्यान हेडफोन लावण्याच्या विषयावर बोलत होता. त्याने अरबाज याचा मुलगा अरहान आणि त्याच्या मित्रांना सल्ला दिला की कधीही दोन्ही कानांना हेडफोन लावणे चुकीचे आहे. एक कान कायम आजूबाजूला काय चालले आहे याचा अंदाज येण्यासाठी मोकळा ठेवावा असा सल्ला सलमान याने आपल्या भाच्याला दिला. त्यावेळी त्याने श्रीलंकेतून विमानातून येतानाचा भयानक अनुभव शेअर केला.
अचानक टर्बुलेंस सुरु झाला –
आम्ही श्रीलंकेहून आईफा सोहळ्यावरुन परतत असताना एक भयानक अनुभव आला. सगळेच मजामस्ती हसत खिदळत असताना आमचे विमान अचानक टर्बुलेंसमध्ये आले आणि आमचे विमान गड गड गड असा आवाज करीत हळू लागले. सर्वांना वाटले की काही प्रॉब्लेम नाही. नंतर पुन्हा तसे होऊ लागले. हे ४५ मिनिटे सुरु होते. सर्व लोक शांत बसले होते. सलमान आणि त्याचे सहकारी एका प्रायव्हेट जेटमधून परतत असताना हा भयानक अनुभव आल्याचे त्याने पॉडकास्टमध्ये सांगितले.
माझ्या सोबत सोहेल देखील होता. एकाच कुटुंबातील आम्ही दोघे जण. इतर कलाकार देखील होते. मी सोहेलकडे पाहीले तर तो आरामात घोरत होता. मी एअरहोस्टेस्टकडे पाहीले तर ती येशूची प्रार्थना करीत होती. तेव्हा मला धोक्याची कल्पना आली. पायलट देखील त्रस्त झाला होता. वरुन ऑक्सिजन मास्क खुलले होते. मी मनात म्हणालो की हे तर मी चित्रपटात पाहीले होते. आता प्रत्यक्ष जीवनात पहात होतो. ४५ मिनिटे ही सिच्युएशन होती असे सलमान यावेळी म्हणाला.
विमान लॅण्ड झाल्यावर जीवात जीव आला..
त्यानंतर सर्वकाही ठीक झाले. विमान सुरळीत उडू लागले. तेव्हा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सर्वांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसु आले.नंतर सर्व सामान्य झाले पुन्हा विमान हलू लागले.हे दहा मिनिटे झाले. त्यानंतर पुन्हा सगळे शांत झाले.त्यानंतर विमान लँड होईपर्यंत एकाच्याही तोंडून शब्द फुटला नाही. जसे विमानाच्या बाहेर पाऊल पडले पुन्हा सगळ्याचे चाल बदलली आणि सगळे धाडसी बनले असे सलमान यावेळी म्हणाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List