Health Tips: मूंग, मसूर, हरबार…कोणत्या डाळीत सर्वाधिक प्रोटीन
100 ग्रॅम हरबरा डाळीत 28-30 ग्रॅम प्रोटीन असते. सर्वाधिक प्रोटीन असणारी ही डाळ आहे. ज्या लोकांना मसल्स गेन करायची आहेत, त्यांच्यासाठी ही डाळ सर्वोत्तम आहे. या डाळीत फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नीशियम मुबलक आहेत. त्यामुळे हाडे मजबूत होतात. तसेच पोट दीर्घकाळ भरलेले असते.
100 ग्रॅम मूंग डाळीत जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन असते. मूंग डाळ पचण्यासाठी चांगली आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी ही डाळ उत्तम आहे. यामध्ये फायबर आणि एंटीऑक्सीडेंट्स शरीरला डिटॉक्स करण्यास मदत करतात.
100 ग्रॅम मसूर डाळीत जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन असते. या डाळीत प्रोटीन सोबत आयरन आणि फाइबर मुबलक असते. एनीमियाचा आजार असणाऱ्यांसाठी ही डाळ फायदेशीर आहे. आरोग्यासाठी ही डाळ चांगली आहे. कारण यामध्ये एंटीऑक्सीडेंट्स आणि फायबर कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित करते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List