Chhattisgarh News – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

Chhattisgarh News – बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून दोघांची हत्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना दोन गावकऱ्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिजापूर जिल्ह्यातील बुगदीचेरू गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. करम राजू आणि माडवी मुन्ना अशी हत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच बिजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याआधी 26 जानेवारी रोजी भैरमगढ परिसरात गुप्त माहिती पुरवल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी एका व्यक्तीची हत्या केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List