Sunita Williams News – सुनिता विल्यम्सचा अंतराळात साडेपाच तास स्पेसवॉक, रचला नवा विक्रम
हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर मागील अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. दोघंही सातत्याने तिथले व्हिडीओ फोटो शेअर करत असतात. त्या दोघांनी अंतराळात 5.5 तास स्पेसवॉक करत नवा विक्रम केल्याची घोषणा नुकतीच नासाने केली आहे. सुनिता विल्यम्स यांचा हा नववा आणि बुच विल्मोर याचा पाचवा विक्रम आहे. या मिशन दरम्यान सुनिता यांनी जवळपास 62 तास आणि 6 मिनीटे अंतराळात वॉक केले असून ती नासाच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर या दोघांनीही त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले, या मोहिमेत दोघे रेडियो फ्रिक्वेन्सी ग्रुप अँटेना काढून टाकणे, डेस्टिनी प्रयोगशाळा आणि क्वेस्ट एअरलॉकमधून पृष्ठभागाच्या सामग्रीचे नमुने गोळा करणे समाविष्ट होते.
नासाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, ते स्पेसएक्स सोबत मिळून सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरुन सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्याचे काम करत आहे. हे दोघं अंतराळवीर गेल्या अनेक महिन्यांपासून अंतराळ स्थानकात अडकले आहेत. दोघं जून 2024 मध्ये बोईंगच्या स्टारलायनर या अंतराळयानाच्या चाचणीसाठी गेले होते. आठ दिवसांचे मिशन होते. मात्र दोघेही आपल्या मूळ अंतराळातील यान स्टारलाईनरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे अडकले. ऑगस्टमध्ये नासाने घोषणा केली की स्पेसएक्सद्वारे फेब्रुवारीमध्ये दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणले जाईल. मात्र, स्पेसएक्स नवीन अंतराळयान तयार करत असल्याने त्यांचा मुक्काम आणखी लांबला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलिकडेच स्पेसएक्स लवकरच दोन अमेरिकन अंतराळवीरांना परत आणण्यासाठी एक मोहीम सुरू करेल, असे सांगितले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List