Swara Bhaskar – अकाऊंट कायमचं बंद केल्यानं स्वरा भास्कर X वर संतापली, नाराजी केली व्यक्त

Swara Bhaskar – अकाऊंट कायमचं बंद केल्यानं स्वरा भास्कर X वर संतापली, नाराजी केली व्यक्त

आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हीचं X अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं आहे. याबाबत स्वरा भास्करने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. X ने तिच्या दोन वेगवेगळ्या पोस्टने कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचा दावा केल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे X ने तिचं थेट अकाऊंट कायमचे बंद केल्यानं तिनं इन्स्टावरून नाराजी व्यक्त केली आहे.

स्वरानं म्हटलं आहे की, मला दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी कॉपीराईट उल्लंघन केल्याचा इशारा आला होता. यानंतर माझं अकाऊंट कायमचं बंद करण्यात आलं आहे, असं तिच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. स्वराने 26 जानेवारीला आणि गुरुवारी 30 जानेवारीला पोस्ट केली होती. त्याचा स्क्रीनशॉट तिनं इन्स्टावर पोस्ट केला आहे. 26 जानेवारीला तिनं तिच्याच मुलीचा तिरंगा घेतलेला फोटो पोस्ट केला होता. तर गुरुवारी तिने गांधी हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल अभी जिंदा है, असं टेक्स्ट असलेला फोटो पोस्ट केला होता. या दोन्हीवर कॉपीराईट उल्लंघन केल्याचा दावा केला आहे. यावरून तिनं नाराजी व्यक्त केली आहे.

Swara Bhaskar Instagram post

 

महात्मा गांधींबाबतचा हा नारा एक प्रगतीशील आंदोलनाचा लोकप्रिय नारा आहे. त्यात कॉपीराईटच्या उल्लंघनाची गोष्ट येते कुठून? असा सवाल तिनं केला आहे. याचबरोबर दुसरा फोटो माझ्या मुलीचा आहे. त्यात तिचा चेहरा लपविलेला आहे. ती देशाचा झेंडा फडकवत आहे. माझ्या मुलीच्या फोटोवर कोणाचा कॉपीराईट आहे असाही सवाल तिने केला आहे. हे हास्यास्पद असून या दोन्ही पोस्ट कोणत्याही कॉपीराईटच्या व्याख्येत येत नाहीत. या दोन्ही ट्विटना मास रिपोर्ट करण्यात आले आहे. हा मला त्रास द्यायचा प्रयत्न आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे. X ने कृपया हे पहावे आणि आपला निर्णय बदलावा, असं स्वरानं म्हटलं आहे.

दरम्यान, स्वराचं ट्विटर हँडल इतरांना जरी दिसत असलं तरी ती ते लॉगिन करू शकत नाही.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर
Chhagan Bhujbal Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ चर्चेत असतात. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी जाहीर विरोध केल्यानंतर मनोज...
‘लहानपण हरवून बसली..’; मायरा वायकुळला रडताना पाहून नेटकऱ्यांचा संताप, पालकांनाही सुनावलं
आलिया, दीपिका नाही तर, ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री
मायबाप रसिक, मराठी नाटकाच्या पडला प्रेमात, बक्षिस म्हणून दिलं एक तोळा सोनं
प्रिती झिंटाची भारतातच नाही तर परदेशातही गडगंज संपत्ती, 50 व्या वर्षी अभिनेत्री इतक्या कोटींची मालकीण
सलमान खानची बहीण रस्ते अपघातात गंभीर जखमी, फोटो समोर येताच सर्वत्र खळबळ
रात्रभर झोपल्यानंतर सकाळी का येतो आळस, काय आहे जास्त झोप येण्याचे कारण?