मालिकाविजय की बरोबरी? हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात आज घमासान

मालिकाविजय की बरोबरी? हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात आज घमासान

राजकोटवर इंग्लंडने राज्य गाजवत पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेतील आपले आव्हान कायम राखत चुरस वाढवली होती. आता शुक्रवारी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर रंगणाऱया चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा हिंदुस्थान मालिका विजयासाठी उतरणार आहे, तर दुसरीकडे इंग्लंड मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि त्यातच इंग्लंडने राजकोटमध्ये आपली कमाल दाखवल्यामुळे पुण्यात टी-20 चा थरार पाहायला मिळणार, हे निश्चित आहे.

हिंदुस्थानने राजकोट जिंकून मालिका जिंकण्याची मौल्यवान संधी गमावल्यामुळे पुण्यातील लढतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. तिसऱया सामन्यात सव्वाशे धावांत इंग्लंडचे आठ फलंदाज गारद झाले होते. त्यांचा डाव फार लांबण्याची शक्यताही नव्हती. मात्र लियाम लिव्हिंगस्टोनने केलेली खेळी आणि दहाव्या क्रमांकाच्या जोडीची 24 धावांची भागी सामन्याला कलाटणी देणारी ठरली. इंग्लंडने उभारलेले 172 धावांचे आव्हान हिंदुस्थानच्या फलंदाजांना पेललेच नाही.

इंग्लंडही जोशात

पहिले दोन सामने पराभूत झाल्यामुळे इंग्लंडचा संघ खचला होता, मात्र त्यांनी संधी मिळताच राजकोट जिंकत आपल्या आव्हानाला जीवनदान दिले. कर्णधार जोस बटलर हाच संघासाठी धावा ठोकतोय. मात्र फिल सॉल्ट, हॅरी ब्रुक या दोन्ही घणाघाती फलंदाजांना आपला फॉर्म अद्याप गवसलेला नाही. पण ते दोघेही पुण्यात आपली खेळी दाखवतील, असा विश्वास बटलरने व्यक्त केलाय. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेला इंग्लंड पुण्यात बरोबरी साधून मालिकेला मुंबईपर्यंत ताणण्याचा प्रयत्न करणार आहे.

हिंदुस्थानची फलंदाजी चिंतेचा विषय

तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा हेच दोघे हिंदुस्थानच्या विजयात महत्त्वाचे फलंदाज ठरले. हे दोघेही राजकोटला अपयशी ठरल्यामुळे हिंदुस्थानला पराभवाची झळ बसली. या सामन्यात हार्दिक पंडय़ाने 40 धावा काढल्या असल्या तरी तो संघाला विजयासमीप पोहोचवू शकला नाही. तसेच संजू सॅमसन, सूर्यकुमार यादवचे सातत्याने अपयशी होणे ही संघासाठी चिंतेची बाब ठरतेय. रिंकू सिंहचा फिटनेस आणि खराब फॉर्मही संघाला अडचणीत आणणारा ठरतोय.

दुसरा वेगवान गोलंदाज खेळवणार?

हिंदुस्थानने खोलवर फलंदाजी करण्यासाठी केवळ एकाच वेगवान गोलंदाजाला खेळविण्याचा निर्णय पहिल्या तीन सामन्यांत घेतला होता, मात्र हा निर्णय राजकोटमध्ये अपयशी ठरला. त्यामुळे पुण्यात खेळताना हिंदुस्थानी संघ एक वेगवान आणि चार फिरकी याच फॉर्म्युल्यासह उतरतो की दुसरा वेगवान गोलंदाजही खेळवतो, हे उद्या सामन्याच्या आधीच निश्चितपणे कळू शकेल. राजकोटमध्ये हिंदुस्थानी संघव्यवस्थापनाने अर्शदीप सिंहला विश्रांती देत मोहम्मद शमीला खेळवले आणि हा निर्णय खूप महागडा ठरला. फॉर्मात असलेल्या अर्शदीपची उणीव संघाला प्रखरतेने जाणवली आणि चौदा महिन्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱया मोहम्मद शमीला फारसे काही करता आले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर… संजय राऊत यांचं मोठं विधान काय? आम्ही राज ठाकरेंच्या पुढच्या वाटचालीवर… संजय राऊत यांचं मोठं विधान काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारल ईव्हीएमच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला. या मुद्द्यावरून त्यांनी भाजप सरकारला घेरलं. त्यामुळे राज ठाकरे...
औषध कसलं हे तर विष, दारूमुळे कर्करोग? थेट हायकोर्टाचा ठोठावला दरवाजा, हा दावा वाचाच
सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट, हल्ला करणारा आणि अटकेतील आरोपीचं सत्य अखेर समोर
‘सैराट’ फेम तानाजी गलगुंडेच्या नव्या लूकची चर्चा; मोनालिसा बागलसोबत जमणार जोडी
सासरच्यांनी करीयर केलं उद्ध्वस्त, नवऱ्याने केली फसवणूक’, खडतर होतं गायिकेचं खासगी आयुष्य
एलन मस्क यांचे नोबेलसाठी नामांकन
जितक्या नोटा मोजाल, तितक्या घरी घेऊन जा; चीनमधील कंपनीची अजब ऑफर