जेनेटिक टेस्टिंग सुरू करणारे राजस्थान ठरले पहिले राज्य, गर्भातच दुर्मिळ आजाराचे निदान
आई-वडिलांच्या गुणसूत्रांमधून मुलांपर्यंत पोहोचणाऱया दुर्मिळ आजाराचा आता गर्भातच शोध घेता येईल. यासाठी जयपूरच्या सवाई मानसिंग मेडिकल कॉलेजमध्ये लवकरच जेनेटिक टेस्टिंगची सुविधा सुरू होणार आहे. त्यासाठी मेडिकल जेनेटिक विभागाची स्थापना केली जाईल. या जेनेटिक टेस्टिंगची सुविधा करणारे राजस्थान हे पहिले राज्य आहे. या सेंटरमध्ये दुर्मिळ आजारावर उपचार होतीलच, पण गर्भातील जेनेटिक आजाराचीही माहिती मिळेल. पेंद्र सरकारने 63 प्रकारचे जेनेटिक डिसॉर्डर नोटिफाय केले आहेत. त्यांचे उपचार महाग असतात. स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी नावाच्या दुर्मिळ आजारावर अत्यंत महागडे इंजेक्शन असते. इंजेक्शनची किंमत 16 कोटींपेक्षा अधिक असते.
– दुर्मिळ आजार सेंटरचे नोडल ऑफिसर डॉ. प्रियांशू माथुर म्हणाले, जगात सात हजार दुर्मिळ आजार आहेत. त्यापैकी केवळ 400 दुर्मिळ आजारांच्या उपचारावर औषधे उपलब्ध आहेत. त्यातील 5 टक्के आजारांवरील औषधे महाग आहेत, तर 95 टक्के आजार स्वस्त आहेत.
– हिंदुस्थानात 4 ते 6 टक्के जेनेटिक डिसॉर्डरची प्रकरणे आहेत. देशात दरवर्षी जेनेटिक डिसॉर्डरने चार लाखांहून जास्त मुले जन्माला येतात.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List