Baba Ramdev – ज्यांचा तीर्थक्षेत्रावर मृत्यू होतो ते देवाच्या चरणी जातात, बाबा रामदेव यांची प्रतिक्रीया
![Baba Ramdev – ज्यांचा तीर्थक्षेत्रावर मृत्यू होतो ते देवाच्या चरणी जातात, बाबा रामदेव यांची प्रतिक्रीया](https://www.newsexpressmarathi.com/media/1264/2025-01/baba-ramdev.jpg)
महाकुंभात मौनी अमावस्येच्या मुहुर्तावर अमृतस्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी त्रिवेणी संगमावर झाली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 भाविकांचा मृत्यू झाला तर 60 हून अधिक भाविक मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेनंतर योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रतिक्रीया देताना लोकांनी शिस्तीत राहायला हवे असे म्हटले आहे. तसेच ज्यांचा तीर्थक्षेत्रावर मृत्यू होतो ते देवाच्या चरणी जातात, असेही ते म्हणाले.
#WATCH | Delhi | On Maha Kumbh stampede, Yog guru Baba Ramdev says, “… I appeal to anyone visiting Maha Kumbh that the Government and the Administration are fulfiling their duties, but we should follow self-discipline as well. The first characteristic of Dharma is patience…… pic.twitter.com/Gib45Vxlfs
— ANI (@ANI) January 29, 2025
”ही घटना अत्यंत दु:खद आहे. कोट्यवधी लोकांचे तिथे होते. एवढ्या मोठ्या गर्दीत एका जरी व्यक्तीकडून काही चूक झाली तर अशा घटना घडू शकतात. प्रशासन आपलं कार्य योग्य प्रकारे करतायत पण स्वत:ला शिस्तीत राहायला हवे. संगमावर जायला मिळाले तर चांगलेच आहे. सगंमाच्या स्पर्शान सगळीकडचं पाणी पवित्र झालं आहे. जिथे तुम्हाला मिळेल तिथे स्नान करा. शेकडो वर्षाने असे अमृत पर्व येतात त्यामुळे शिस्तीत राहून आपण अशा घटना टाळू शकू. ज्यांचा आज मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली. तसंच ज्यांचा तीर्थक्षेत्रावर मृत्यू होतो ते देवाच्या चरणी जातात”, असे रामदेव बाबा म्हणाले.
About The Author
![Manisha Thorat- Pisal Picture](https://www.newsexpressmarathi.com/media/100/2023-08/manisha.jpg)
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
![बड्या मंत्र्याच्या आशीर्वादाने 400 कोटींच्या भूखंडाच्या प्रॉपर्टी कार्डवर बिल्डरचे नाव](https://www.newsexpressmarathi.com/media/c1264x948/2025-02/pune-property.jpg)
Comment List