जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक शिवरायांनी केला, नितीन बानुगडे पाटील यांनी व्यक्त केले मत
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातच नव्हे, तर देशाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारके त्यांनी केलेल्या तेजस्वी कार्यामुळे दिसतील. प्रत्येकाच्या मनात स्वराज्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व 2025चे आयोजन निगडी येथील भक्ती-शक्ती चौक, ‘अ’ प्रभागजवळील नियोजित महापौर निवास मैदान, चिंचवड येथील छत्रपती संभाजीनगर, डांगे चौक, थेरगाव तसेच पिंपरी येथील एच. ए. कॉलनी यहा या ठिकाणी 15 ते 19 फेब्रुवारी 2025च्या या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन काल निगडी येथील भक्ती-शक्ती येथे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ‘असे होते छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान देताना बानुगडे-पाटील बोलत होते. यावेळी सचिन चिखले, मारुती भापकर, उपायुक्त अण्णा बोदडे, मुख्य आपत्ती व व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, नितीन देशमुख, बापूसाहेब गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शाहीर अंबादास तावरे, भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, नकुल भोईर, सागर तापकीर, बालाजी दानवले, दत्ताभाऊ देवतरासे, रोहिदास शिवनेकर, प्रकाश जाधव, धनाजी येळकर, वैभव जाधव, साईराज बोराडे, अनिकेत रसाळ, राजू पवार, सचिन अल्हाट, मीराताई कदम, सतीश काळे, अभिषेक म्हसे, प्रतीक इंगळे, नीलेश शिंदे, वसंतराव पाटील, कुणाल कांबळे, संदीप निकम, गणेश सरकटे, संतोष जाधव, स्वप्नील शिंदे, मुख्य लिपिक किसन केंगले, लिपिक अभिजित डोळस, माहिती व जनसंपर्क विभागातील तन्मय भोसले, चेतन मराडे, प्रफुल्ल कांबळे, ओंकार पवार, पीयूष घसिंग उपस्थित होते.
बानुगडे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही मग ते कोणत्याही प्रांतातील असो, स्त्रियांचा सन्मान करा, परस्त्री मातेसमान असते, अशी अनेक मूल्ये महाराजांनी पुढच्या पिढीला दिली. जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालात केला. त्यांनी त्यांच्या आयुष्यात बजावलेल्या कर्तव्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही. त्यांच्या या व्यापक कार्याचे आणि इतिहासाचे पठण आजच्या पिढीने करायला हवे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शाहीर रामानंद उगले यांनी पोवाड्याचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना वडील आप्पासाहेब उगले यांनीही साथ देत आपली शाहिरी सादर केली. प्रास्ताविक मारुती भापकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. आभार सचिन चिखले यांनी मानले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List