Beauty Tips: फळे खा आणि त्वचेवरही लावा! सौंदर्य वाढीसाठी फायदेशीर ठरणारी फळे

Beauty Tips: फळे खा आणि त्वचेवरही लावा! सौंदर्य वाढीसाठी फायदेशीर ठरणारी फळे

महिलांच्या सौंदर्यात चेहरा हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळेच चेहरा जपताना महिला अनेक प्रकारची कसरत करताना दिसतात. तेव्हा आधुनिक अनेक नामांकित ब्रॅंन्डस् आज खूप प्रकारचे क्रीम, लोशन आणि ट्रिटमेंट घेऊन आलेल्या आहेत. अनेकदा हे प्रोडक्ट खर्चिक असतात आणि मुख्य म्हणजे याचा उपयोग होईल का नाही हा भाग वेगळाच. त्यामुळेच आपण घरी असणारी फळे आपल्या त्वचेवर लावली तर आपण सौंदर्य अधिक चांगले जपू शकतो.

यासाठी अनेकदा पपई, संत्रीचा वापर केलेला आपण पाहिला, ऐकला असेल. मात्र अन्य काही फळेही त्यासाठी उपयोगी ठरतात.

फळांमधून मिळणारे पोषक मूल्य नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला हानी सुद्धा पोहोचणार नाही. त्वचेसाठी फळांमधून खूप सारे चांगले घटक मिळतील. त्यामुळे आपण कोणती फळे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले हे बघुया.

द्राक्षे

द्राक्षाचा वापर त्वचेसाठी फारच गुणकारी आहे. द्राक्षामुळे त्वचेला एक आगळीच चकाकी लाभते. मुख्य म्हणजे द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी अधिक मात्रेत असल्यामुळे द्राक्षे आपल्या त्वचेसाठी केव्हाही बेस्ट. व्हिटॅमिन सी हे निरोगी त्वचेसाठी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या पडतात.

टोमॅटो किंवा टोमॅटोची पेस्ट

टोमॅटो  म्हणजे केवळ फळ न मानता आपण फळ भाजी म्हणतो. त्यामुळे टोमॅटो आपल्या किचनमध्ये कायम असतोच. हे उत्तम आरोग्यदायी फळ आहे. त्वचेला अँटीऑक्सिडेंट बूस्ट आणण्यास टोमॅटोमुळे मदत होते. साधा कच्चा टोमॅटो रोज त्वचेवर लावल्यास सुद्धा आपल्याला खूप आराम मिळतो.

चेरी

नितळ त्वचेसाठी चेरीचा उपयोग पाश्चात्य देशात खूप केला जातो. आपल्याकडे आता चेरी हे फळ मिळू लागले आहे. त्यामुळे चेरी खाऊनही आपल्याला अनेक पोषकद्रव्ये मिळतीलच. चेरी त्वचेवर लावल्याने चमकदार नितळ कांती प्राप्त होईल. चेरी देखील अँटिऑक्सिडेंटचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खळबळजनक! धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला खळबळजनक! धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला
मोठी बातमी समोर येत आहे, धावत्या लोकलमध्ये तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे....
न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा; मंत्री माणिकराव कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
अभिनेत्रीचे आजोबा 80 व्या वर्षी अडकले विवाहबंधनात, बायको फक्त 21 वर्षांची, राजकारणी कुटुंबाशी कनेक्शन
खोट्या अप्पीचे सत्य येणार का कुटुंबासमोर, ‘अप्पी आमची कलेक्टर’मध्ये अमोलला आली शंका
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा काही तासांत होणार घटस्फोट? वकिलांकडून मोठी माहिती समोर
Vitamin C Serum: संत्री खाल्ल्यानंतर त्याची साल फेकुन देताय? ‘या’ पद्धतीनं करा वापर..
लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? तज्ञांकडून जाणून घ्या