शिवसेनेचे खासदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्याकडून आर्थिक आमिष
खासदार फोडण्यासाठी सत्ताधाऱ्याकडून आर्थिक आमिषे दाखवली जात आहेत, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय देशमुख यांनी आज केला. नाशिकमधील वणी येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागले तरी शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि लोकांना न्याय मिळवून देईल यात तीळमात्र शंका नाही, असा विश्वासही खासदार देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला.
नाशिकमधील वणी येथे आयोजित कार्यक्रमात खासदार संजय देशमुख बोलत होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून रात्रंदिवस सुरू आहे, असा गंभीर आरोपही खासदार देशमुख यांनी यावेळी केला. विरोधी पक्षाचे आमदार, खासदार पह्डण्यासाठी देशात व महाराष्ट्रात दबावतंत्राचा वापर होतोय. पैशाचे आमिष दाखवले जातेय. वेगवेगळय़ा युक्त्या लढवल्या जात आहेत, असे खासदार देशमुख म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List