‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री… जगणे सुखद करा!’दिव्यांगाने पैठणच्या नाथसागरात उडी घेत जीवन संपवले

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री… जगणे सुखद करा!’दिव्यांगाने पैठणच्या नाथसागरात उडी घेत जीवन संपवले

राक्षसी बहुमत घेऊन जनतेच्या छातीवर बसलेल्या महायुतीच्या राज्यात दररोज शेतकरी, बेरोजगार, महिलांच्या आत्महत्या होत आहेत. आता त्यात दिव्यांगाचीही भर पडली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिव्यांगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. नापिकीमुळे बँकेचे कर्ज फेडता येत नाही. शासनाकडे घरकुलाची माफक अपेक्षा केली, पण तीदेखील पूर्ण झाली नाही. असे म्हणत त्र्यंबक कडुबा धोत्रे महाराज (45, रा. नेवपूर, ता. कन्नड) यांनी पैठणच्या नाथसागरात उडी घेऊन जीव दिला. दरम्यान, धोत्रे यांच्या नातलगांनी कन्नडच्या तहसीलसमोर मृतदेह आणून ठेवला आणि न्यायाची मागणी केली. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतरच धोत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कन्नड तालुक्यातील नेवपूर येथील त्र्यंबक धोत्रे हे सततचा पाऊस आणि त्यामुळे होणाऱया नापिकीमुळे वैतागले होते. त्यातच बँकेचा कर्जफेडीसाठी तगादा लागल्याने ते सैरभैर झाले होते. 26 जानेवारी रोजी ते गावाहून छत्रपती संभाजीनगरला आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांच्या आंदोलनात सहभागी झाले. परंतु दिव्यांगांच्या बाबतीत महायुती सरकारची अनास्था पाहून ते अस्वस्थ झाले. याच अस्वस्थतेतून धोत्रे यांनी 27 जानेवारी रोजी ग्रामपंचायत व्हॉट्सअॅप ग्रुपवर आत्महत्या करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली.

शोधाशोध केली…

व्हॉट्सअॅप ग्रुपवरील संदेश वाचून सरपंच मनोज देशमुख आणि माजी सरपंच भारत आवारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही. कन्नड पोलिसांनीही शोध घेण्यास सुरुवात केली. मोबाईल लोकेशनच्या आधारे अहिल्यानगरमधील शेवगाव गाठले. शोध घेत घेत पोलीस शेजारीच असलेल्या जायकवाडी धरण परिसरात पोहोचले. धरणाच्या भिंतीवर मोबाईल आणि चप्पल दिसून आली. पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांचे पथकही शोधमोहिमेत सहभागी झाले. अखेर रात्री नाथसागर जलाशयात त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह आढळून आला.

काय म्हटले आहे सुसाईड नोटमध्ये…

‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दिव्यांगांना घरकुल मिळाले पाहिजे. त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. दिव्यांगांचे जगणे सुखद झाले पाहिजे. परंतु दिव्यांगांची कोणतीही मागणी महायुती सरकार मान्य करत नाही. दिव्यांगांना साधे शौचालयाचेही पैसे मिळत नाहीत. नापिकीमुळे मी बँकेचे कर्जही फेडू शकत नाही. अपंगत्वावर मात करून आतापर्यंत जगलो. परंतु मी थोडय़ाच वेळात हे जीवन संपवत आहे. महायुती सरकारने आतातरी दिव्यांगांच्या मागण्या मान्य करून न्याय द्यावा.

प्रशासनाकडून आश्वासनानंतर अंत्यसंस्कार

‘सततचा पाऊस, नापिकीमुळे बँकेचे कर्ज फेडू शकत नाही. अपंगत्वावर मात करून आतापर्यंत जगलो; परंतु आता जीवन संपवत आहे. महायुती सरकारने आता तरी दिव्यांगांकडे लक्ष द्यावे. मी गेल्यावर माझ्यासाठी रडायचे नाही. तीच माझ्यासाठी श्रद्धांजली ठरेल!’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण मोठा ट्विस्ट… ममता कुलकर्णी पुन्हा बनली महामंडलेश्वर, पहिल्यांदाच उघड केलं पद सोडण्याचं कारण
प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला. अध्यात्माच्या मार्गाला लागलेली ममता महामंडलेश्वर झाली. पण तिला महामंडलेश्वर पद दिल्याने किन्नर आखाड्यात...
मुंबई गोवा महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, आई-मुलाला 30 फूटांपर्यंत फरफटत नेलं
आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण, अपात्र झोपडीधारकांचे काय होणार ?
प्रियांका चोप्राच्या वहिनीला लग्नानंतर होतोय याचा त्रास,दाखवल्या मानेवरील खुना; म्हणाली ‘हे काय चाललंय?’
एक्स गर्लफ्रेंड मलायकाचा भन्नाट डान्स पाहून अर्जून कपूरची बोलती बंद, म्हणाला, सध्या मी…
पोलीस चौकशीला रणवीर अलाहाबादिया गेलाच नाही;अखेर मुंबई पोलिसांनी घेतली पुढची अॅक्शन