Mahakumbh 2025 – ‘सनातन धर्म हाच आपला राष्ट्रधर्म’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मत
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ सोहळा सुरू आहे. या महाकुंभासाठी वेगवेगळ्या देशातून विविध समाजाच्या लोकांनी हजेरी लावली आहे. दरम्यान, प्रयागराजमध्ये सुरू असलेला हा सोहळा कोणत्याही एका जाती किंवा धर्मासाठी नसून, तो सर्व धर्म, संस्कृती जपणारा मेळा आहे. आपला “सनातन धर्म हा राष्ट्र धर्म असल्याचे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत महाकुंभ सोहळ्याबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी सनानत धर्म हा राष्ट्रधर्म असल्याचं म्हटलं आहे. ‘सनातन धर्म हा एक मानवी धर्म आहे. प्रत्येकाची देवाप्रती पूजा, विधी, उपासना वेगवेगळी असू शकते, प्रत्येकाची जात वेगवेगळी असू शकते. मात्र आपला धर्म एकच आहे, आणि तो म्हणजे सनातन धर्म आहे. कुंभ सनातन धर्माचे एक महापर्व आहे, याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही. असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान 45 दिवस महाकुंभ मेळ्याचे पर्व सुरू राहणार आहे. येणाऱ्या पिढ्यांसाठी हे दिवस अविस्मरणीय असतील याबाबत माझ्या मनात शंका नाही असे योगी आदित्यनाथ. कुंभमेळ्याने एकतेचा संदेश संपूर्ण देशात दिला आहे. कुंभमेळ्यात सहा कोटी लोकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमात कुंभमेळ्यात स्नान करणं पवित्र मानलं जातं. यामध्ये कुठलाही भेदाभेद केला नाही. आत्तापर्यंत या महाकुंभात 10 कोटी भाविकांनी स्नान केलं आहे, असे योगी आदित्यनाथ या मुलाखतीत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List