शारदाश्रमच्या इरा जाधवचे तुफानी त्रिशतक, 157 चेंडूंत ठोकल्या नाबाद 346 धावा

शारदाश्रमच्या इरा जाधवचे तुफानी त्रिशतक, 157 चेंडूंत ठोकल्या नाबाद 346 धावा

हिंदुस्थानी क्रिकेटला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकरसारखी रत्नं देणाऱया जगद्विख्यात शारदाश्रम विद्यामंदिरच्या 14 वर्षीय इरा जाधवने मेघालयाविरुद्ध तुफानी फलंदाजी करताना अवघ्या 157 चेंडूंत 346 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईने 50 षटकांच्या 19 वर्षांखालील वन डे करंडकात 3 बाद 563 धावांचा डोंगर उभारला. तसेच मुंबईच्या युवा गोलंदाजांनी मेघालयाच्या मुलींना 25.4 षटकांत अवघ्या 19 धावांत गुंडाळत 544 धावांच्या विश्वविक्रमी विजयाचीही नोंद केली. आता मुंबईची उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राशी गाठ पडेल.

मुंबईच्या इराने पहिल्या षटकापासून मेघालयाच्या दुबळय़ा गोलंदाजीच्या चिंधडया उडवत चौकार-षटकारांची आतषबाजी केली. तिने कर्णधार हर्ली गालाच्या (116) साथीने दुसऱया विकेटसाठी 274 धावांची भागी रचली. इराने आपल्या खेळीत 42 चौकारांसह 16 षटकारांचा वर्षाव केला. 19 वर्षांखालील महिलांच्या क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या लिझेल लीने केई संघाविरुद्ध 2010 साली नाबाद 427 धावांची खेळी केली होती.

फक्त फटकेबाजीचा आनंद घेतला

मेघालयाची गोलंदाजी काहीशी कमकुवत होती आणि चेंडूही बॅटच्या टप्प्यात येत होते. त्याचा फायदा उठवत मी फक्त मनमुराद फटकेबाजी केली. मी कोणत्याही विक्रमासाठी खेळत नव्हती. या झंझावातामुळे माझी कोणत्या स्पर्धेत निवड व्हावी, ही अपेक्षा नाही. मी फक्त माझा खेळ केलाय. सध्या माझा फोकस फक्त खेळावर असल्याचेही त्रिशतकवीर इराने सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ऊस तोडणी मशीनसाठी पाच हजार जणांकडून 8 लाखांप्रमाणे पैसे लुटले, सुरेश धस यांचा आणखी एक आरोप ऊस तोडणी मशीनसाठी पाच हजार जणांकडून 8 लाखांप्रमाणे पैसे लुटले, सुरेश धस यांचा आणखी एक आरोप
ऊस तोडणी मशीन 141 द्यायचे होते. मात्र, यांनी पाच हजार जणांकडून 8 लाखांप्रमाणे पैसे वसूल केले, असा आरोप करत पहिला...
रुपी बँकेच्या एकरकमी कर्जफेड योजनेला सरकारची मंजुरी, सक्षम बँकेत विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू
विरोधकांना बसायला एकही जागा ठेवू नका! पंचायत ते संसद फक्त भाजपच हवा; अमित शहा यांचे हुकूमशाही बोल
महागाईची संक्रांत, भाज्या कडाडल्या; भेंडी, पापडी, वाल, वांगी, गाजर 15 ते 20 टक्क्यांनी महागले
पत्नीचा विनयभंग करणाऱ्या पतीला चपराक, हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्यास दिला नकार
नागपुरातून वर्षभरात 559 लाडक्या लेकी बेपत्ता!
बीड जिल्हा पुन्हा हादरला, राखेची वाहतूक करणाऱ्या डंपरने उडवले, सरपंचाचा जागीच मृत्यू