OnePlus चा ‘हा’ टॅब पहिल्यांदाच मिळत आहे 19,749 रुपयांमध्ये, किंमत आहे 40 हजार; जाणून घ्या काय आहे ऑफर

OnePlus चा ‘हा’ टॅब पहिल्यांदाच मिळत आहे 19,749 रुपयांमध्ये, किंमत आहे 40 हजार; जाणून घ्या काय आहे ऑफर

जर तुम्ही टॅबलेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या सेलमध्ये OnePlus चा एक जबरदस्त टॅबलेट सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. ऑफर्सचा फायदा घेऊन तुम्ही हा टॅब 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. आम्ही OnePlus Pad बद्दल बोलत आहोत. Flipkart Republic Day Bonanza sale मध्ये वनप्लस पॅड मोठ्या सवलतीसह उपलब्ध आहे. या व्हॅल्यू फॉर मनी डीलबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ…

OnePlus Pad पॅड हिंदुस्थानात दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला होता. लॉन्चच्या वेळी याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये होती आणि 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये होती. OnePlus Pad चा 12GB + 256GB व्हेरिएंट सध्या Flipkart वर 22,249 रुपयांच्या किंमतीसह लिस्ट करण्यात आला आहे. तुम्ही HDFC बँक क्रेडिट कार्डद्वारे हा टॅब खरेदी केल्यास तुम्हाला 2,500 रुपयांची इन्स्टंट बँक सूट मिळू शकते. यानंतर याची किंमत 19,749 रुपये होईल. म्हणजेच लॉन्चच्या किंमतीपेक्षा 20,250 रुपयांनी कमी.

OnePlus Pad चे स्पेसिफिकेशन

OnePlus Pad मध्ये फुल HD+ रिझोल्यूशनसह 11.6-इंचाचा LCD डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट आणि 500 निट्स ब्राइटनेस आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 चिपसेटने सुसज्ज आहे. टॅबमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळते. हा टॅबलेट फक्त वायफाय कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो. यात 13-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे, जो EIS ला सपोर्ट करतो आणि 30fps वर व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको ! भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको !
एसटी महामंडळाने २५ जानेवारी २०२५ पासून १५ टक्के भाडेवाढ केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. ही भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत न...
‘त्या’ कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट
अयोध्येत तुफान गर्दी, दोन भाविकांचा मृत्यू
Photo – पाहा जवानांच्या ‘बिटींग द रिट्रीट’च्या सरावाची ही सुंदर दृश्ये
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, हिंदुस्थान चीनमधील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, ऋषभ पंतला डच्चू; ‘या’ दिवसापासून सुरू होणार सामना
ईडीची मोठी कारवाई, शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेडची 80 कोटींची संपत्ती जप्त