चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडो रुपये लुटले, जोधपूरमध्ये चौघांना अटक
चिनी सायबर स्कॅमर्सच्या मदतीने करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी जोधपूरमध्ये चौघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या एक दहावीचा विद्यार्थी आहे. अक्षय कुमार, राकेश, रामदिन आणि भोम सिंग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही टोळी आपली कमिशन काढून घेत उर्वरीत रक्कम क्रिप्टोकरन्सीद्वारे चीनी साथीदारांना पाठवत असत. यासाठी टोळक्याने जवळपास 35 बनावट बँक खाती उघडली होती. या खात्याद्वारे त्यांनी सात महिन्यात 50 कोटी रुपये चीनला पाठवले, असे सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी विनोद कुमार यांनी सांगितले.
कोटा पोलिसांनी 16 जानेवारी रोजी चारही आरोपींना जोधपूर येथून अटक केली. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची मोडस ऑपरेंडी उघड झाली. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List