केंद्र सरकारनं मित्रांचं 10 लाख कोटींचं कर्ज माफ केलं – अरविंद केजरीवाल

केंद्र सरकारनं मित्रांचं 10 लाख कोटींचं कर्ज माफ केलं – अरविंद केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या (Delhi Assembly Election 2025) पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (AAP) अध्यक्ष अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मोठा दावा केला आहे. भाजपच्या केंद्र सरकारने आपल्या जवळच्या काही लोकांचे 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे ते म्हणाले आहेत. ते म्हणाले, ”एका व्यक्तीचे 46 हजार कोटी रुपये माफ करण्यात आलं आहेत. 400 ते 500 लोकांवर संपूर्ण सरकारी खजिना उधळला जात आहे.”

अरविंद केजरीवाल म्हणाले, ”ही केवळ दिल्लीच नाही तर देशाला वाचवण्याची निवडणूक आहे. देशाचा आणि राज्याचा पैसा कसा आणि कशावर खर्च करायचा हे जनतेनं ठरवायचं आहे. जनता कोणत्याही वस्तूंवर कर देते. हा जमा झालेला पैसा खर्च करण्याचे सरकारकडे दोन मार्ग आहेत. एक मार्ग म्हणजे लोककल्याणाच्या सुविधांवर खर्च करणं आणि दुसरा मार्ग म्हणजे आपल्या जवळच्या अब्जाधीश मित्रांना कर्ज देणं आणि काही वर्षांनी कर्ज माफ करणं.”

ते म्हणाले, ”गेल्या पाच वर्षात केंद्रातील भाजप सरकारनं 400-500 लोकांचं 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केलं आहे. एका व्यक्तीवर 47 हजार कोटी रुपयांचे कर्ज होतं. त्यांना फक्त 450 कोटी रुपयांची सेटलमेंट करून उर्वरित कर्ज माफ केलं. आणखी एक होते, ज्यांच्यावर साडेसहा हजार रुपयांचे कर्ज होतं, ते केवळ दीड हजार कोटी रुपयांमध्ये सेटल झालं. याशिवाय दोन लोकांचे 50 हजार कोटी रुपये माफ करण्यात आलं.”

अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, ”दिल्लीतील लोकांकडे दोन मॉडेल्स आहेत, पहिले केजरीवाल मॉडेल, जिथे जनतेचा पैसा जनतेवर खर्च केला जातो आणि दुसरे भाजपचे मॉडेल, जिथे जनतेचा पैसा त्यांच्या श्रीमंत मित्रांच्या खिशात जातो. आता कोणते मॉडेल निवडायचे हे जनतेनं ठरवायचं आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको ! भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको !
एसटी महामंडळाने २५ जानेवारी २०२५ पासून १५ टक्के भाडेवाढ केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. ही भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत न...
‘त्या’ कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट
अयोध्येत तुफान गर्दी, दोन भाविकांचा मृत्यू
Photo – पाहा जवानांच्या ‘बिटींग द रिट्रीट’च्या सरावाची ही सुंदर दृश्ये
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, हिंदुस्थान चीनमधील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, ऋषभ पंतला डच्चू; ‘या’ दिवसापासून सुरू होणार सामना
ईडीची मोठी कारवाई, शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेडची 80 कोटींची संपत्ती जप्त