लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे!; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे!; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

वैवाहिक मतभेद तसेच प्रेमसंबंधात कटुता निर्माण होऊन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढले आहे. अशाच वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. लग्नाला नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही. हा भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत गुन्हा ठरु शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने म्हटले आहे.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टात धाव घेतलेल्या महिलेविरुद्ध पोलिसांनी कलम 306 अंतर्गत दाखल केलेला गुन्हा खंडपीठाने रद्द केला.

महिलेच्या मुलावर प्रेम करणाऱ्या तरुणीने आत्महत्या केली होती. महिलेच्या मुलाने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. तसेच अपिलकर्त्या महिलेनेही लग्नाला विरोध केला होता आणि तिने मृत तरुणीबाबत अपमानजनक टिप्पणी केली होती. याप्रकरणी मुलासह महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तथापि, आरोपपत्र आणि साक्षीदारांच्या जबाबांसह रेकॉर्डवरील सर्व पुरावे जरी ग्राह्य धरले तरी, अपीलकर्त्या महिलेविरुद्ध एकही पुरावा नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने महिलेविरुद्धचा गुन्हा रद्द केला.

प्रियकराशिवाय जगू शकत नसल्यास जीव दे, असे महिलेने तरुणीला सुनावले होते. हादेखील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको ! भाडेवाढीचा कंडक्टरच्या खिशांवर बोजा, महामंडळाचा उपाय म्हणजे आजार परवडला पण उपचार नको !
एसटी महामंडळाने २५ जानेवारी २०२५ पासून १५ टक्के भाडेवाढ केल्यानंतर गोंधळ उडाला आहे. ही भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत न...
‘त्या’ कंपन्या धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढवणार? अंजली दमानियांनी अजितदादांकडे सादर केली बॅलेन्स शीट
अयोध्येत तुफान गर्दी, दोन भाविकांचा मृत्यू
Photo – पाहा जवानांच्या ‘बिटींग द रिट्रीट’च्या सरावाची ही सुंदर दृश्ये
कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार, हिंदुस्थान चीनमधील उच्चस्तरीय बैठकीत निर्णय
विराट कोहली 13 वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, ऋषभ पंतला डच्चू; ‘या’ दिवसापासून सुरू होणार सामना
ईडीची मोठी कारवाई, शेरॉन बायो मेडिसिन लिमिटेडची 80 कोटींची संपत्ती जप्त