पंजाब, हरयाणामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च; पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत, भगवंत मान यांचा इशारा
प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर मार्चचे आवाहन केले आहे. पंजाबमध्ये ट्रॅक्टर मार्च तालुका पातळीवर करण्यात येणार आहे. ट्रॅक्टर त्यांच्या गावातून ठरलेल्या मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत जाऊन गावात परततील. आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅकर मार्च काढला आहे. शेतकऱ्यांच्या मार्चला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पाठइंबा दिला असून पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत, असा इशारा केंद्राला दिला आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी पंजाब आणि हरियाणात ट्रॅक्टर मार्च करणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, पंजाबच्या शेतकऱ्यांनी कधीही देशाला निराश केले नाही. आमचे अन्नदाता आंदोलने आणि उपोषण करत आहेत. तरीही केंद्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत, हेस सरकारने लक्षात ठेवावे. काही लोकं पंजाबला अस्थिर करू इच्छितात. मात्र, त्यांचा जाव आम्ही हाणून पाडू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पंजाबमध्ये 200 पेक्षा जास्त ठिकाणी एक लाखाहून अधिक ट्रॅक्टर रस्त्यावर उतरले आहेत. हरियाणातही शेतकरी आंदोलकांची संख्या लक्षणीय आहे. संयुक्त किसान मोर्चा, पंजाब शेतकरी संघटना, किसान मजदूर मोर्चा यांनी ट्रॅक्टर मार्चची घोषणा केली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांच्या मार्चला पाठिंबा जाहीर केला आहे, ते म्हणाले की, पंजाबच्या शेतकऱ्यांनी कधीही देशाला निराश केले नाही. आमचे अन्नदाता आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून यावर योग्य मार्ग काढण्याची गरज आहे. केंद्राने ग्रामीण विकास निधी आणि मंडईंसाठी निधी जारी करावा. आपल्याला आपल्या मागण्यांसाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील. पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत. आमचे शतकरी माघार घएणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही लोक पंजाबला अस्थिर करू इच्छितात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List