राज्यात गुन्हेगारी वाढली, दिवसाढवळ्या खून आणि अत्याचार होत आहेत – राजन विचारे
राज्यात गुन्हेगारी वाढली असून दिवसाढवळ्या खून आणि अत्याचार होत आहेत, असं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांनी केलं आहे. ठाण्यात माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत. केंद्र सरकार आणि निवडणूक आयोग ज्या प्रकारे काम करत आहे, त्या माध्यमातून संविधान नष्ट करण्याचं काम होत आहे, असंही राजन विचारे म्हणाले.
राजन विचारे म्हणाले की, ”आज सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय किंवा निवडणूक आयोग असेल, हे कशा पद्धतीने काम करत आहे, हे आपण पाहत आहोत. यातच जगभरात ईव्हीएम मशीन वापरला बंदी असताना आपल्याकडे इतक्या लोकांचा विरोध असतानाही याचा वापर निवडणुकीत केला जात आहे.”
विचारे पुढे म्हणाले की, ”आज संपूर्ण देशात गुन्हेगारी खूप वाढलेली आहे. जे गुन्हेगार आहेत, ते मोकाट सुटलेले आहेत. दिवसाढवळ्या खून आणि अत्याचार होत आहेत. महिलांवरील अत्याचाराची संख्या वाढलेली आहे.” ते म्हणाले, हे लोक सत्तेचा गैफायदा घेत आहेत, म्हणून आम्ही मागणी केली आहे की, ईव्हीएमवर बंदी घालून निवडणूक बॅलेट पेपवर घ्याव्यात.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List