मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, झिरवळांची खंत; अजितदादा म्हणाले…
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सुरू असलेले मानापमान नाट्य दीड महिन्यांनंतरही सुरूच आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर मिंधे आणि अजित पवार गटातून नाराजीचा सूर उमटला होता. त्यानंतर दोन पालकमंत्र्यांची नावे मागे घेण्याची नामुष्की फडणवीस सरकारवर आली होती. आता या नाट्याचा पुढचा अंक सुरू झाला असून अजित पवार गटातील नेते आणि कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपल्याला गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केल्याचा सूर आळवला आहे.
मी पहिल्यांदा पालकमंत्री झालो आणि मला इथे आल्यावर समजले की माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. जिथे पाण्याची समस्या आहे, एमआयडीसीही धड नाही त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले, एवढे आम्ही गरीब आहोत. मुंबईला गेल्यावर वरिष्ठांना याचा जाब विचारणार आहे, असे झिरवळ वसमत येथील एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
दरम्यान, नरहरी झिळवळ यांच्या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारचे वक्तव्य योग्य नाही. त्यांच्याशी चर्चा करून काय समज, गैरसमज झालेला असेल तो दूर करेल, असे अजित पवार म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List