झोपडपट्टीवासीयांना घरे द्या, मी निवडणूक लढवणार नाही; केजरीवालांचे शहांना आव्हान
मोदी सरकारने अनेक भागात झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्याच जमिनीवर त्यांनी घरे बांधून झोपडपट्टीवासीयांना दिली तर मी निवडणूक लढवणार नाही, असं आव्हान आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिलं आहे. आज दिल्लीत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी हे आव्हान शहा यांना दिलं आहे.
ज्या झोपडपट्टीवासीयांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत, त्यांची प्रकरणे मागे घ्या. मी निवडणूक न लढवण्याची हमी देतो, असं आव्हानही केजरीवाल यांनी भाजपला दिलं. दरम्यान, शनिवारी अमित शहा यांनी ऐका सभेत भाजप प्रत्येक झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरूपी घरे देणार असल्याचे आश्वासन दिलं. यावर बोलताना केजरीवाल असं म्हणाले आहेत.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ”भाजप दिल्लीत सत्तेवर आल्यास सर्व झोपडपट्ट्या पाडल्या जातील. झोपडपट्टीवासीयांनी भाजपला मत दिले तर ते स्वतःच आत्महत्या करण्यासाठी सही करत आहेत, असं होईल. भाजपचे लोक झोपडपट्टीवासीयांची जमिनी हिसकावून घेतील.”
भाजपला झोपडपट्टीवासीयांची चिंता नसून मित्राच्या पैशाची चिंता आहे, असा आरोप त्यांनी केला. 10 वर्षांपूर्वी भाजपने झोपडपट्ट्या पाडण्याचा प्रयत्न केला होता. अधिकाऱ्यांना येथे आणून मी झोपडपट्ट्या पाडू दिल्या नाहीत. त्यादिवशी त्यांनी आणलेल्या बुलडोझरमुळे एका 6 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला होता, असं यावेळी केजरीवाल म्हणाले.
आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर पलटवार
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List