पश्चिम बंगालमध्ये तिरुपती एक्स्प्रेसला दुसऱ्या गाडीची धडक; 3 डबे रुळावरून घसरले,वाहतूक खोळंबली
पश्चिम बंगालमधील हावडा येथील संत्रागाछी आणि शालीमार स्थानकादरम्यान दोन गाड्यांमध्ये झालेल्या धडकेमुळे अपघात झाला. संत्रागाछी-तिरुपती एक्स्प्रेस संत्रागाछीहून शालीमारच्या दिशेने जात होती. दरम्यान, एक इंजिन साइड लाईनवर दोन बोगी ओढत होते. यानंतर दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात 3 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. या अपघातामुळे सलीमार-संत्रागाछी मार्गावरील गाड्यांची वाहतूक खोळंबली आहे.
अपघातात तिरुपती एक्स्प्रेसच्या दोन बोगी आणि दुसऱ्या ट्रेनचा एक डबा रुळावरून घसरला. या मार्गावरील सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच या अपघाताची रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List