सोलापुरात मुंबई-चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
वंदे भारतनंतर सोलापुरात आता मुंबई-चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे. पारेवाडी आणि वाशिंबे दरम्यान ही घटना घडली असून गेल्या 10 दिवसातील दुसरी घटना आहे. यात अपंग डब्यातील एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर त्वरीत उपचार करण्यात आले. अन्य जखमी झाल्याची माहिती नाही.
दगडफेकीमुळे ट्रेनच्या खिडक्या तुटल्या. घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये खिडक्यांच्या काचेचे तुकडे झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी सोलापूर रेल्वे पोलिसांनी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. गेल्या 10 दिवसांत दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याआधी वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. ट्रेनच्या सी-11 कोचला लक्ष्य करण्यात आले होते. वंदे भारत नंतर हल्लेखोरांनी मुंबई-चेन्नई एक्सप्रेसला लक्ष्य करत दगडफेक केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List