मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात करार केलेल्या कंपन्या हिंदुस्थानीच, परदेशी कंपन्यांचा महाराष्ट्राला प्रतिसादच नाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात पहिल्याच दिवशी पाच लाख कोटी रुपयांचे करार केल्याचा गवगवा महायुती सरकारकडून केला गेला. पण सामंजस्य करार ज्या कंपन्यांबरोबर केले गेले त्या बहुतांश सर्व कंपन्या हिंदुस्थानातीलच आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातील कंपन्यांबरोबर करार करायला दावोस दौऱ्याची गरज काय होती, अशी टीका आता होऊ लागली आहे. दुसरीकडे नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी दावोसमधील महाराष्ट्राच्या स्टॉलकडे ढुंकूनही पाहिले नसल्याचे सांगितले जात आहे.
स्वित्झर्लंडच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत लवाजमा घेऊन गेले आहेत. महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक येईल असा दावा त्यांनी केला होता. मंगळवारी पहिल्याच दिवशी पाच लाख कोटींचे करार झाल्याचा गाजावाजाही करण्यात आला. माध्यमांमध्ये पह्टो प्रसारित केले गेले, पण वास्तव पाहिले तर वेगळेच आहे. जगभरातील परदेशी कंपन्या दावोसमध्ये आल्या आहेत, परंतु त्यापैकी कुणालाही महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करण्यात रस नसल्याचे दिसून आले आहे. पहिल्या दिवशी झालेल्या करारात बहुतेक सर्व पंपन्या या हिंदुस्थानातीलच आहेत. त्यांच्याशी करार हिंदुस्थानातही झाले असते, मग दावोसमध्ये जाऊन करार करण्यामागे नेमका उद्देश काय? परदेशी पंपन्या महाराष्ट्रात येण्यास का तयार नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
रिलायन्स, अॅमेझॉनसोबत करार
दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी सर्वात मोठय़ा गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा आहे. रिलायन्स समूह महाराष्ट्रात 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहे. यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे 3 लाख रोजगार निर्मिती यातून होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दुसरी मोठी गुंतवणूक ही अॅमेझॉन करणार असून, ती 71,795 कोटी रुपये इतकी आहे. एमएमआर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून 83,100 इतके रोजगार निर्माण होणार आहेत.
– दोन दिवसांत महाराष्ट्राने 15.70 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार केले असून त्यातून 15.95 लाख रोजगार निर्मिती होणार असा दावा आज करण्यात आला.
काही गोष्टी लवकरच समोर येतील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱयावर असून तिथे होत असलेल्या करारांबाबत राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. त्याबाबत बोलताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. दावोसच्या काही घडामोडींवर आमचा अभ्यास चालू असून लवकरच जनतेसमोर काही गोष्टी येतील, असा इशारा त्यांनी सरकारला इशारा दिला. यापूर्वीच्या दावोस दौऱयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेली कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी आदित्य ठाकरे यांनीच उघड केली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List