आज शिवसेनेचा महाकुंभ, अंधेरीतील विराट मेळाव्यात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ

स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
वेळ – सायंकाळी – 6 वाजता

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आज शिवसेनेचा महामेळावा अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने निष्ठावंतांचा महाकुंभच भरणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या मेळाव्यात धडाडणार आहे. शिवसैनिकांना ते काय संदेश देणार, कोणती दिशा देणार याबद्दल राजकीय वर्तुळाबरोबरच मीडिया आणि सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. नव्या वर्षात उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच जाहीर मार्गदर्शन असल्याने ‘आम्ही शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे’, ‘आम्ही निष्ठावंत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे’, असे अभिमानाने सांगत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिकांनी आज मुंबईकडे कूच केले आहे.

शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणार

देशातील हिंदू आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या नसानसात राष्ट्राभिमान, धर्माभिमान, भाषाभिमानाचा वन्ही चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास या महामेळाव्यानिमित्त पुन्हा उलगडणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर होणार आहे.

अंधेरी पश्चिमेच्या वीरा देसाई रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी 6 वाजता हा महामेळावा होणार आहे. शिवसेनेचे नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, संपर्कप्रमुख व संलग्न संघटनांचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे या महामेळाव्यानिमित्त तमाम शिवसैनिकांशी जाहीर संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित असा होता. परंतु पराभवाला कवटाळून न बसता नव्या डावाकडे वळणे हीच खरी खिलाडूवृत्ती असते. त्याच ईर्षेने पुन्हा नव्या लढाईसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. पक्षप्रमुखांच्या आदेशाची प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे उद्याच्या महामेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे 21 आणि 22 जानेवारी रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांचाही या महामेळाव्यात गौरव केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शिवसेनाप्रमुखांना मानवंदना

रिगल सिनेमासमोर असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, सचिन अहिर, अशोक धात्रक, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, आमदार मनोज जामसुतकर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर, सुरेश पाटील, संतोष शिंदे आणि मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Saif Ali Khan Attack: चाकूचा तुकडा शोधण्यासाठी पोलीस वांद्रे तलावाजवळ, सैफ अली आणि करिनाला पोलीस संरक्षण Saif Ali Khan Attack: चाकूचा तुकडा शोधण्यासाठी पोलीस वांद्रे तलावाजवळ, सैफ अली आणि करिनाला पोलीस संरक्षण
अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लामला घेऊन आज पोलीस वांद्रे तलावाजवळ गेले. पोलीस त्या चाकूच्या तुकड्याचा...
उपकरप्राप्त इमारतीच्या रहिवाशांना दिलासा; विकासकांनी रखडवलेले पाच प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच
खोटी माहिती दिल्याने गमावली नोकरी, न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार
आज शिवसेनेचा महाकुंभ, अंधेरीतील विराट मेळाव्यात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यात करार केलेल्या कंपन्या हिंदुस्थानीच, परदेशी कंपन्यांचा महाराष्ट्राला प्रतिसादच नाही
शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी राज्यभरात विविध उपक्रम, शक्तिस्थळावर निष्ठावंतांची वारी