आधी पत्नीची हत्या केली, मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळले

आधी पत्नीची हत्या केली, मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळले

तेलंगणात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यात माजी सैनिकाने पत्नीची हत्या केली. मग मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळून तलावात फेकल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. त्याने पत्नीची हत्या नेमकी कोणत्या कारणातून केली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. गुरू मूर्ती असे आरोपी पतीचे नाव आहे.

गुरू सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तो कांचन बागेत डीआरडीओमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. गुरु आणि मयत वेंकट माधवी यांचा 13 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुलं आहेत.

गुरूने 18 जानेवारी रोजी माधवीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून प्रेशर कुकरमध्ये उकळले आणि जिलेलागुडा येथील तलावात फेकले. यानंतर तो आपल्या पालकांसह मीरपेट पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली.

गुरुच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी बेपत्ता माधवीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गुरुवर संशय आल्याने त्यांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीत गुरुने गुन्ह्याची कबुली देत धक्कदायक माहिती दिली.

पोलिसांनी गुरुचा जबाब नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस तलावात मृतदेहाच्या अवयवांचा शोध घेत आहेत. हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिर्डी दर्ग्याचा वाद : आपली विचारसरणी बदलली का ? राष्ट्रवादीच्या आमदाराला मुस्लीम संस्थेचा सवाल शिर्डी दर्ग्याचा वाद : आपली विचारसरणी बदलली का ? राष्ट्रवादीच्या आमदाराला मुस्लीम संस्थेचा सवाल
शिर्डीतील साई मंदिरातील मजारचा वाद वाढला आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शिर्डीत येऊन या संदर्भात दोन समाजात तेढ निर्माण...
शुटींगवेळी बॉलिवूड अभिनेत्याला चक्क भगवान शीव दिसले; म्हणाला,’ ते पर्वतावरून चालत होते’
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला, लेकीचं नाव ठेवलंय खास
लेख – एआय मानसिकता
एआय क्रांती – एक दुधारी शस्त्र
जळगाव भीषण रेल्वे अपघात प्रकरण : चहा विक्रेत्याने ट्रेनला आग लागल्याची पसरवली अफवा
शेतीचा कायापालट : एआयचे योगदान