अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सातत्याने सुरूच आहे. बुधवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 86.33 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णय घेतले. त्याचे पडसाद जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटत आहेत. त्यामुळे आगामी काळातही रुपयाची घसरण कायम राहण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपासून रुपयाचे सातत्याने अवमूल्यन सुरू आहे. मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 86.58 रुपयांवर बंद झाला. बुधवारी बाजार उघडताच ही घसरण कायम होती. रुपया 86.56 पर्यंत घसरला. बाजार बंद होताना रुपया किंचित 0.25 पैशांनी सावरला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 86.33 रुपयांवर बंद झाला. डॉलरच्या तुलनेत इतर चलनांचीही घसरण आज पहायला मिळाली.

रुपयाची आणखी घसरण होऊ शकते – रघुराम राजन

आगामी काळात रुपयाची आणखी घसरण होऊ शकते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत बहुतांशी चलनांचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने चलन बाजारात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी मांडले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

MAHARERA : घराच्या स्वप्नाला सुरक्षेचे कोंदण; महारेराचे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल, मार्गदर्शक सूचना केल्या जारी MAHARERA : घराच्या स्वप्नाला सुरक्षेचे कोंदण; महारेराचे ग्राहकांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल, मार्गदर्शक सूचना केल्या जारी
स्वप्नाच्या आशियानासाठी अनेक जण जीवतोड मेहनत करतात. आयुष्यभराची कमाई गुंतवणूक करतात. अशा ग्राहकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना कायदेशीर बळ...
राम गोपाल वर्मा यांना 3 महिन्यांचा तुरुंगवास; नेमकं काय आहे प्रकरण?
स्वत: 1 लाख देणार अन् सैफला म्हणतो 11 लाख दे… रिक्षावाल्याला किती लाखाची मदत करायची?; मिका सिंगच्या सल्ल्याने चर्चा तर होणारच
“आम्हाला आर्थिक समस्याच नव्हती..”; सैफवर हल्ला करणाऱ्या चोराच्या वडिलांचा गौप्यस्फोट
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत अनोखं वळण; देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार?
दावोसमध्ये जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी लोणचे, मसालेवाले, उदबत्तीवाल्यांशी करार केले – संजय राऊत
दिल्ली गुंडगिरी सहन करणार नाही, केजरीवाल यांचा अमित शहांना इशारा