‘आई तुळजाभवानी’ मालिकेत अनोखं वळण; देवी तुळजाभवानीला भवानीशंकरांची खरी ओळख पटणार?
'कलर्स मराठी' वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत अनेक घटना घडत असतानाच देवीने शाकंभरीच्या रुपात दर्शन दिलं आणि सृष्टीचं महत्त्व सांगितलं. तर दुसरीकडे देवीच्या हाकेला ऐकून काळभैरव भूतलावर प्रकटले आहेत.
देवी आपलं अढळ स्थान शोधण्याची जबाबदारी भैरवाला देते. या आठवड्याच्या उत्तरार्धात तुळजाभवानी आणि भवानीशंकर यांच्या नात्यातील रुसवे-फुगवे, नात्यातील गोड क्षण बघायला मिळणार आहेत. त्यांच्यातला समज–गैरसमजाचा गुंता अधिक वाढत जात असून भवानीशंकर रूपात पृथ्वीवर निवास करणाऱ्या महादेवांना देवी ओळखणार का? हा रंजक कथाभाग उलगडत आहे.
देवींची कन्या अशोकसुंदरीला आलेला भवानीशंकराबद्दलचा संशय वाढू लागला आहे. पण, महादेवांना देखील आई तुळजाभवानीसमोर खऱ्या रुपात येण्याची आतुरता लागून राहिली आहे.
तर दुसरीकडे श्रृंगीचे पृथ्वीवर आगमन झाल्यावर साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण, श्रुंगी महाराजांचं असं अचानक पृथ्वीवर येण्याचं नेमकं कारण काय असेल? याचा खुलासा हळूहळू होईलच.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List