पहिल्या सिनेमातून रवीना टंडनच्या लेकीला मिळालं यश, अभिनेत्री मानले साईबाबांचे मानले आभार…
नव्वदीच्या दशकात हिंदी सिनेमात आपल्या अदा आणि अभिनयाने सुपरहिट ठरलेली अभिनेत्री रविना टंडन हिने आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचे दर्शन घेतलं. रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी हिने ‘आझाद’ सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं असून तिचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय. आझाद सिनेमात अजय देवगणसह त्याचा पुतण्या अमन देवगणची देखील भुमिका आहे तर राशा थडानीच्या नृत्य आणि अभिनयाचं देखील सिनेमा प्रेमींकडून कौतूक होतय…17 जानेवारी आझाद हा सिनेमा प्रदर्शित झाला असून सिनेमाने चांगली कमाई केलीय.
साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्री लेकीच्या यशाचं कौतुक देखील केलं. अभिनेत्री म्हणाली, ‘मी बालपणापासुन शिर्डीला येत आहे. साई मंदिरात मला माझे वडील साईबांबासमोर हात जोडून उभे असल्याचा भास होतो…दोघांचेही आशिर्वाद मला येथे आल्यानंतर मिळतात…’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘आझाद सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. याचा आनंद आहे मात्र सध्याचा काळ नवोदीत कलाकारांसाठी संघर्षाचा आहे.. राशाला साईबाबांनी सांभाळून घेतल्यानं तिचं फार कौतुक होतय… साईबाबा आम्हाला सांभाळून घेतात त्यामुळे आभार माणण्यासाठी साई दरबारी आली…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
राशा थडानी स्टारर ‘आझाद’ सिनेमाच्या आतापर्यंत कमाईबद्दल सांगायचं झालं तर, 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या सिनेमाने 5 दिवसांत 5.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. येत्या काळात सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल माहेर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रवीना हिची लेक राशा थडानी गेल्या काही दिवसांपासून तिच्या पहिल्या सिनेमामुळे चर्चेत आहे. अखेर राशाचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला आणि हीट देखील होत आहे. सध्या राशा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पण अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर राशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. राशाचा पहिला सिनेमा हीट ठरल्यानंतर चाहते अभिनेत्रीच्या दुसऱ्या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List