स्वप्ननगरीत घर मिळेना झाले…पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस 18’ स्पर्धकाने व्यक्त केली खंत

स्वप्ननगरीत घर मिळेना झाले…पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस 18’ स्पर्धकाने व्यक्त केली खंत

‘बिग बॉस 18’ संपला असला तरी त्याचे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने अजूनही चर्चेत आहेत. या शोमधील वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालेली स्पर्धक यामिनी मल्होत्राही सध्या चर्चेत आली ते सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे. मुंबईसारख्या स्वप्ननगरीत घर खरेदी करायला अडचणी येत असल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

यामिनी मल्होत्राने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. नमस्कार मित्रांनो, मी एक गोष्ट शेअर करू इच्छित आहे जी निराशाजनक आहे. माझे मुंबईवर जेवढे प्रेम आहे तेवढेच इथे घर मिळणे फार कठीण झाले आहे. घर शोधल्यानंतर मला अनेक प्रश्न विचारले गेले आहेत, जसे की तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम?, गुजराती आहात की मारवाडी? एवढेच नाही तर मी अभिनेत्री आहे हे ऐकताच अनेकांनी लगेच नकारही दिला आहे. पुढे तिने लिहिले की, मी एक अभिनेत्री आहे म्हणून मला घर मिळण्याचा हक्क नाही का? 2025 मध्येही हे असे प्रश्न विचारण्याची लोकांची मानसिकता आहे, हे धक्कादायक आहे. आपण खरोखरच मुंबईला स्वप्नांचे शहर म्हणू शकतो का? असे पहिल्यांदाच घडले नाही. याआधीही अनेक कलाकारांनी अशाप्रकारच्या अडचणींचा सामना केला आहे.

यामिनी मल्होत्राने बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला होता. पण ती अंतिम फेरीत पोहोचू शकली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११  जण ठार Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून मारल्या उड्या; ११ जण ठार
जळगावच्या पाचोरा जवळील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अत्यंत मोठी दुर्घटना घडली आहे. एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या....
गोड बोलून सही करून घेतली अन्… जवळच्या व्यक्तीनेच केला घात; अभिनेत्रीचे लाखो रुपये घेऊन फरार
डिस्चार्जनंतरही सैफ अली खानला ‘ही’ तीन कामे करता येणार नाहीत; डॉक्टरांनी केलीये सक्त मनाई
Jalgaon Train Accident – जळगाव येथील अपघात दुर्दैवी, आदित्य ठाकरे यांची मृतांना श्रद्धांजली
20 दिवसात 93 गुन्हे, 138 बांगलादेशींची मुंबई पोलिसांकडून धरपकड; तिघांना मायदेशी हाकलले
अखेर केंद्रीय गृहमंत्रालयाला जाग; बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करण्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना आदेश
Video हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा… दमदार डायलॉग, भव्य सेट… पाहा ‘छावा’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर