अमिताभ बच्चन यांनी विकलं आलिशान घर, किंमत जाणून व्हाल थक्क, तब्बल 168 टक्के फायदा
महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. शिवाय त्यांच्याकडे अनेक अपार्टमेंट देखील आहेत. त्यातील एक अपार्टमेंट मुंबईतील ओशिवारा येथे आहे. हाच अपार्टमेंट बिग बी यांनी 2025 मध्ये मोठ्या नफ्यासह विकला आहे. 31 कोटींना विकत घेतलेली ही मालमत्ता अमिताभ बच्चन यांनी 83 कोटींना विकली आहे. अमिताभ बच्चन यांच्या या अपार्टमेंटमध्ये अभिनेत्री क्रिती सनॉन भाडेकरु म्हणून राहत होती.
अपार्टमेंट विकून अमिताभ बच्चन यांनी 168 टक्क्यांचा फायदा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये बिग बी यांनी 31 कोटी रुपयांमध्ये हे आलिशान घर खरेदी केलं होतं. बिग बींचा आलिशान अपार्टमेंट 529.94 स्क्वेअर मीटर क्षेत्रात बांधले आहे, ज्याचा कार्पेट एरिया 5185.62 स्क्वेअर फूट आहे. यात एक टेरेस देखील आहे, जो 445.93 स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेला आहे. यात 6 गाड्यांच्या पार्किंगची सुविधा आहे.
अपार्टमेंटमध्ये राहायची कृती सेनॉन
अमिताभ बच्चन यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये क्रिती सनॉनला हा अपार्टमेंट भाड्याने दिला होता. आलिशान घरासाठी क्रिती भाडं म्हणून अमिताभ बच्चन यांना दर महिन्याला 10 लाख रुपये द्यायची. सिक्योरिटी डिपॉसिट म्हणून अभिनेत्रीकडून 60 लाख रुपये घेण्यात आले होते.
जया बच्चन – अमिताभ बच्चन यांची संपत्ती
जया बच्चन यांनी एका निवडणूक शपथपत्रात आपल्या आणि पतीच्या संपत्तीविषयीची माहिती दिली होती.रिपोर्टनुसार, 2022-2023 या वर्षांत जया बच्चन यांनी आपली एकूण संपत्ती 1.63 कोटी रुपये असल्याचं जाहीर केलंय. तर दुसरीकडे या रिपोर्टमध्ये असंही म्हटलंय की अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती 273.74 कोटी रुपये इतकी आहे.
शपथपत्रात असाही खुलासा करण्यात आला आहे की जया यांचा बँक बॅलेन्स 10.11 कोटी रुपये इतका आहे. तर बिग बींकडे जवळपास 120.45 कोटी रुपये आहेत. या दोघांची संपत्ती मिळून 849.11 कोटी रुपये इतकी आहे. बिग बी आणि जया यांची स्थावर मालमत्ता 729.77 कोटींच्या घरात आहे. त्यांच्याकडे दागिने आणि महागड्या गाड्या देखील आहेत.
अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील अमिताभ बच्चन यांचा बोलबाला असतो. बिग बी कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. वयाच्या 82 व्या वर्षी देखील बिग बी मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. चाहते देखील त्यांच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List