‘बांगलादेशी महीला लॉजवर पकडल्या पण…,’ नितेश राणेंचा सनसनाटी आरोप काय?
मंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महीला पकडल्या त्या एका लाॅजवर पकडल्या मात्र त्या रेल्वे स्टेशनला पकडल्या गेल्याचं दाखवण्यात आलं असा आरोप यावेळी नितेश राणे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नितेश राणे?
कणकवलीत ज्या दोन बांगलादेशी महीला पकडल्या त्या एका लाॅज वर पकडल्या मात्र त्या रेल्वे स्टेशनला पकडल्या गेल्याचं दाखवण्यात आलं. मात्र या मागचा सूत्रधार आणि पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. बांगलादेशाच्या दोन महिला येथे येतात, त्यांना कोण आणतं? त्यांना कुठे ठेवलं जातं, का खोटं बोललं जातं, ही जी काही मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे, त्या जिहादी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही. त्या मानसिकतेला प्रशासनाच्या माध्यमातून ठेचण्याचं काम आम्ही करू आणि ते तुम्हालाही दिसेल, आमच्या जिल्ह्यात ड्रग्ज आणण्याचं काम करणारे हात कापले जातील, असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या जिल्ह्यात प्रशासनामध्ये बीड लॉबी काम करते याची माहिती माझ्या कानापर्यंत आली आहे. त्या संदर्भात कलेक्टर यांना माहिती द्यायला सांगितली आहे, कोणाची मक्तेदारी आणि दादागिरी येथे चालत असेल, बीड आपल्या राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे, त्या जिल्ह्याचे नाव वापरून आपल्या जिल्ह्यात अगर कोण मस्ती करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू. आम्ही मॅनेज न होणारी लोक आहोत, आम्हाला विकत घेण्याची कोणाची क्षमता नाही.
माझ्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. नियमांमध्ये राहुन काम करा असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. प्रत्येक खात्यामध्ये नियमाला धरून जो जो विषय असेल त्याला प्रोत्साहन दिले जाईल. नियमबाह्य कोणी इथे काम करत असेल, त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल, असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List