मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप?

मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप?

मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा दावा केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे यांच्याकडून हा दावा करण्यात आला आहे. 23 जुलैला राज्यात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचं  राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. राहुल शेवाळे यांच्या वक्तव्यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

नेमकं काय म्हणाले राहुल शेवाळे? 

23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत.  दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, आणि त्यामुळे कुठे न कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा असा टोला यावेळी राहुल शेवाळे यांनी लगावला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले? 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळं होणार होते. त्यांच्यासोबत वीस आमदार होते. राज्यात महायुतीचं सरकार आलं, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे.  संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच आता त्यानंतर राहुल शेवाळे यांनी देखील राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी
मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला...
हजामत महागली, सलूनवाल्यांनी किती वाढविले दर पाहा?
Kids Weight Management: ऐन तारुण्यात हृदयविकाराचा धोका का वाढतोय?; ही कारणं माहीत हवीच!
राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक – जयंत पाटील
मुख्यमंत्री पदापासून मंत्रीमंडळ विस्तार ते पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत, संजय राऊत यांचा टोला
Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप
उद्धव ठाकरेंचे शिलेदार नाराज, भूकंप अटळ? सर्वात मोठी बातमी समोर