मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही श्रीमंत त्यांचे भाडेकरु, महिन्याचे भाडे किती? काय आहे व्यवसाय?
Mukesh Ambani Jio World Centre: रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा जिओ वर्ल्ड प्लॉझामधील जागा लुई व्हिटॉन स्टोरने भाड्याने घेतली आहे. फ्रॉन्समधील उद्योजक बर्नार्ड अर्नाल्ट यांची कंपनी LVMH यांचे लुई वुइटन स्टोर आहे. त्यासाठी अंबानी पेक्षा जास्त श्रीमंत असलेले अर्नाल्ट महिन्याला 40.5 लाख रुपये भाडे देत आहे. एलव्हीएमएच जगातील सर्वरात मोठी लग्झरी कंपनी आहे. त्या कंपनीने मुंबईतील बीकेसीत असलेल्या जिओ वर्ल्ड प्लाजामध्ये लग्झरी शॉपिंग डेस्टिनेशन बनवत आहे. बालेनसियागासारखे मोठे ब्रँड या ठिकाणी जागा घेत आहे.
बर्नार्ड अर्नाल्टकडे किती आहे संपत्ती?
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी आहे. आता त्यांच्या उत्पन्नात जगातील श्रीमंत व्यक्ती बर्नाड अर्नाल्ट वाटा देणार आहे. हा वाटा भाड्याच्या माध्यमातून असणार आहे. फोर्ब्जच्या अहवालानुसार, अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती 168.8 अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानी यांची संपत्ती 94.9 अब्ज डॉलर आहे. अर्नाल्ट LVMH चे सीईओ आणि चेअरमन आहे. एलव्हीएमएचचा लग्झरी सामान विक्रीचा मोठा उद्योग आहे. त्यांच्याजवळ लुई वुइटन, टिफनी अँड कंपनी, डायर, गिव्हेची, टॅग ह्यूइर आणि बुल्गारी यासारखे प्रसिद्ध बँड आहे.
बर्नार्ड अर्नॉल्ट हे मुकेश अंबानी यांचे थेट भाडेकरू नाहीत. त्यांची कंपनी LVMH ने अंबानी यांच्या मॉल जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये लीजवर जागा घेतली आहे. जिओ सेंटर आता लग्झरी ब्रँडचे केंद्र बनत आहे. जगातील सर्वात महागड्या ब्रँड्सचे शोरूम या ठिकाणी आहेत. यापैकी एक लुई व्हिटॉनचे शोरूम आहे.
लुई व्हिटॉन स्टोअरने जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये 7,465 स्क्वेअर फूट जागा भाड्याने घेतली आहे. इकोनॉमिक्स टाईमसच्या अहवालानुसार, लुई व्हिटॉन दर महिन्याला त्यासाठी 40.5 लाख रुपये ($48,600) भाडे देत आहेत. हे भाडे मुकेश अंबानी यांच्या कंपनीला जात आहे. म्हणजेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक व्यक्ती असलेले बर्नार्ड दुसऱ्या श्रीमंत व्यक्तीच्या म्हणजे मुकेश अंबानी यांच्या कमाईत अप्रत्यक्षपणे हातभार लावत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List