शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट आहे, पडद्यामागे काय होतायत हालचाली
शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. या भेटीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेमकी काय चर्चा झाली याचा तपशिल समजू शकलेला नाही. शरद पवार यांचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे उभयनेत्यांत चर्चा झाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे जयंत पाटील, आमदार रोहित पवार आणि शिवसेना नेते संजय राऊत आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. या बैठकीत बीड प्रकरणासह अनेक विषयांवर राजकीय घडामोडींवर भेटीमध्ये चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. विधानसभेच्या निवडणूकांत महाविकास आघाडीला यश मिळालेले नाही या पार्श्वभूमीवर महानगर पालिक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीला महत्व आलेले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचा विधानसभा निवडणूकीत मोठा मानहाणीकारक पराभव झाला आहे. त्यामुळे येणाऱ्ंया महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वतंत्रपणे लढविण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निवडणूकांत शिवसेना स्वत:च्या ताकद आजमावून पाहणार आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणूका लढविण्याचा निर्णय घेतल्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचे म्हटले जात आहे. यात विधानसभा निवडणूकांमधील पराभवानंतर आता इंडिया आघाडीची विश्लेषण करणारी बैठक झालेली नसल्याचे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीची संयुक्त बैठक अद्याप आयोजित केलेली नाही. यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती.
विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘ऐकला चलोचा’ नारा दिलेला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय राहावा याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, या भेटीच्या वेळी शरद पवार यांच्या दालनात भारताचा माजी कप्तान सुनील गावस्कर आणि एमसीएचे अजिंक्य नाईक देखील उपस्थित होते.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List