मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ

मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील ट्रायडेंट हॉटेलमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, परिसरात मोठी खळबळ

Mumbai Trident Women Dead Body : मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेलमध्ये एका 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेचा मृतदेह ट्रायडेंट हॉेटेलच्या 27 व्या मजल्यावर आढळला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये देश-विदेशातील लोक राहण्यासाठी येतात. आता मरीन ड्राईव्हच्या ट्रायडेंट हॉटेलच्या २७ व्या मजल्यावर एका ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे. विनती मेहतानी असे या महिलेचे नाव आहे. ही महिला २७ व्या माळ्यावर एका खोलीत राहत होती.

आज नेहमीप्रमाणे ट्रायडेंट हाॅटेलचे कर्मचारी रुम सर्विससाठी गेले होते. मात्र ही महिला दरवाजा उघडत नव्हती. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मास्टर चावीने खोलीचा दरवाजा उघडला. यावेळी ती महिला मृताव्यस्थेत आढळली. यानंतर संबंधित हॉटेल प्रशासनाने तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली.

काहीही संशयास्पद आढळलेले नाही – पोलीस 

यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने पंचनामा केला. यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला पेडर रोडवरील चेलाराम हाऊस परिसरात राहते. ही मृत महिला हाॅटेलमध्ये कधीपासून राहत होती? तिच्याबरोबर इतर कोणी होतं का? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.

महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात

तसेच पोलीस तपासात ही मृत महिला ही आजारी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच तिची आईदेखील आजारी होती. याच तणावात ती होती का, असा प्रश्न विचारला जात आहे. या तपासात आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणाची अधिक तपास पोलिस करत आहे. या  महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप? मोठी बातमी! बाळासाहेबांच्या जयंतीच्या दिवशीच राज्यात मोठा राजकीय भूकंप?
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे, शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मोठा...
शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनी घेतली भेट आहे, पडद्यामागे काय होतायत हालचाली
“होय, मीच तो..”; सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची पोलिसांसमोर कबुली, सांगितलं सर्व सत्य
महिमा चौधरीच्या मुलीच्या सौंदर्यावर चाहते फिदा, 17 व्या वर्षी दिसते आईपेक्षा उंच, तिला पाहून म्हणाल…
प्राजक्ता माळीनंतर तेजश्री प्रधानही थेट आश्रमाच्या वाटेवर; पोस्ट पाहून चाहत्यांना धक्का
‘ब्लॅक’च्या सेटवर लादी पुसली, शिव्याही खाल्ल्या.. आज हाच अभिनेता आहे कोट्यावधींचा मालक
युजवेंद्रकडून धनश्रीने केलीये पोटगीची मागणी? रक्कम ऐकून भुवया उंचावतील