धक्कादायक, नागपूरात तीन वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्लूने मृत्यू, महाराष्ट्रात अलर्ट जारी
महाराष्ट्र नागपूरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील तीन वाघ आणि एका बिबट्याच्या H5N1 व्हायरसने बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. एका वाघाचा मृत्यू २० डिसेंबर रोजी झाला होता. तर अन्य दोघा वाघांचा २३ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे नमुने पाठविण्यात आले. आयसीएआर- नॅशनल इंस्टिटयूट ऑफ हाय सिक्युरिटी एनिमल डिसिज येथे नमूने तपासल्यानंतर हे नमूने H5N1 पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महाराष्ट्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
व्हायरस कुठून आला ?
या प्रयोगशाळेचा अहवाल १ जानेवारी रोजी आला. त्यातून कळले की या प्राण्यांचा मृत्यू H5N1 व्हायरसने झाल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर राज्यातील प्राणी संग्रहालयाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या अधिकारी या प्राण्यांना संसर्ग कोणाकडून झाला याची तपास करीत आहे.
26 बिबटे आणि 12 वाघ हेल्दी
तीन वाघ आणि बिबट्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर प्राणी संग्रहालयातील २६ बिबटे आणि १२ वाघांची चाचणी करण्यात आली. परंतू त्यांच्यात कोणताही विषाणू आढळले नाहीत. या प्राण्यांना झालेला संसर्ग बर्ड फ्लू संक्रमित किंवा कच्चे मांस खाल्याने होत असल्याने झाला असावा असे म्हटले जाते.
108 देशांत व्हायरस
बर्ड फ्लू अर्थात H5N1 व्हायरस १०८ देशात आढळला आहे. पोलर बिअर, अंटार्टिका पेंग्विन, हत्ती, पॉल्ट्री आणि एवढेच काय माणसात या व्हायरस आढळला आहे.नागपूरमध्ये हा व्हायरस आढळल्याने महाराष्ट्र शासनाला अधिकाऱ्यांनी पत्र लिहिले आहे. नागपूर येथील व्हायरसच्या या प्रार्दुभावामुळे सर्वांना प्रतिबंधात्मक उपाय करण्यास सांगितले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List