बॉयफ्रेंडच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीने भोगला तुरुंगवास; म्हणाली, ‘ते 15 दिवस मी फक्त…’
बॉलिवूडमध्ये अशा काही घडना घडत असतात ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजते. असंच काही 14 जून 2020 मध्ये झालं होतं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली होती. अभिनेत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली होती. अभिनेत्रीला सुशांतच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. आता रिया हिने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण अभिनेत्री कायम सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्यासोबत घडलेल्या घटना सांगत असते.
रिया हिने स्वतःच्या पॉडकास्टमध्ये तुरुंगातील दिवसांचा खुलासा केला आहे. पॉडकास्टमध्ये रिया हिच्यासोबत यो यो हनी सिंग होता. यावेळी हनी सिंगने स्वतःच्या आजाराबद्दल देखील सांगितलं. शिवाय रिया आणि हनी यांनी मानसिक आरोग्यावर देखील चर्चा केली.
सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा हनी सिंग बायपोलर डिसऑर्डरचा सामना करत होता. आजारावर रिया म्हणाली, ‘या आजाराला मी फार जवळून पाहिलं आहे. जेव्हा मी तुरुंगात होती, तेव्हा तुरुंगात मी मानसिक आरोग्यावर बोलायचे.’
रिया म्हणाली, ‘लोकांना बायपोलर डिसऑर्डन हा आजार समजत नाही. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला लोकं पागल समजतात किंवा मग त्यांना बाधलं असेल असं देखील म्हणतात. पण असं काहीही नसतं. मी जेव्हा तुरुंगात होती, तेव्हा त्या ठिकाणी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे सुसाइट वॉच…’
‘जे मोठ्या प्रकरणात अडकले आहेत. ज्यांच्या भोवती मीडिया आहे. त्यांच्यासाठी सुसाइट वॉच होतं. कारण परिस्थितीला त्रस्त होऊन कैद्यांनी कोणतं वाईट पाऊन उचलू नये… मी एकांत कारावासात होती, तेथे फक्त 2 महिला होत्या ज्या मला दिसायच्या. दरम्यान, मी मानसिक आरोग्यावर चर्चा केली.’
‘ते 15 दिवस मी फक्त मानसिक आरोग्यावर चर्चा केली. गोष्टी समजून घेतल्या. एका महिलेने मला तिच्या पतीबद्दल सांगितलं होतं. त्याला बायलोपर डिसऑर्डर हा आजार होता. आज मी विचार करते की तुरुंगात राहून मी कोणाचे तरी प्राण वाचवले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजाराला समजनं असतं….’ असं देखील रिया म्हणाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List