Bipasha Basu : त्या रात्री जे घडलं… ; बिपाशाने सांगितलं जॉनसोबतच्या ब्रेकअपचं कारण

Bipasha Basu : त्या रात्री जे घडलं… ; बिपाशाने सांगितलं जॉनसोबतच्या ब्रेकअपचं कारण

बिडी जलैले, बिल्लो रानी आणि अशा एकाहून एक सरस गाण्यांमध्ये अभिनेत्री बिपाशा बासूने जे ठुमके लगावले ते आजही अनेकांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री असलेली बिपाशा आज अभिनयात फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर बरीच ॲक्टिव्ह असते. लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवणाऱ्या बिपाशाचा आज वाढदिवस आहे. तिचं पर्सनल आयुष्यही नेहमीच चर्चेत होतं. आज बिपाशा मॅरिड लाईफ एन्जॉय करत असून पती आणि लेकीसह बराच वेळ घालवताना दिसते. मात्र लग्नापूर्वी तिचं नाव बऱ्याच जणांसोबत जोडलं गेलं होतं. त्यातही अभिनता जॉन अब्राहम आणि बिपाशा यांच्या नात्याची तसेच त्यांच्या ब्रेकअपचीही बरीच चर्चा झाली होती. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर लवकरच ते लग्न करणार असं सर्वांना वाटत होतं, पण एक दिवस अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमीच समोर आली आणि अनेकांना धक्का बसला.

डिनो मोरिया, मिलिंद सोमण, राणा डग्गुबती, हरमन बावेजा आणि जॉन अब्राहम यांसारख्या अनेक अभिनेत्यांसोबत बिपाशा बसूचे नाव जोडले गेले होते परंतु तिने केवळ जॉनसोबतच नाते स्वीकारले. एका मुलाखतीत ब्रेकअपनंतरची घटना बिपाशाने सांगितली होती.

जॉनबद्दल काय म्हणाली बिपाशा ?

तेव्हा एका वृत्तपत्राल दिलेल्या मुलाखतीत बिपाशा जॉनबद्दल प्रथमच बोलली. जॉनशी ब्रेकअपप का झालं, त्याचं खरं कारण काय असा प्रश्नही तिला विचारण्यात आला होता. त्यावेळी बिपाशा म्हणाली की, तिला त्यावेळी लग्न करायचे होते कारण ते दोघे आधीपासून 9 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते पण जॉन हा करियर बनवण्यात बिझी होता, त्याचं संपूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित होतं. त्यामुळे ते लग्नाबद्दल बोलले नाहीत.बिपाशा आणि जॉन लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं, हे सर्वांनाच माहीत होतं.

का केलं ब्रेकअप ?

तिच्यासमोर एक ट्विट आलं आणि जॉन आपली फसवणूक करत असल्याचे बिपाशाला समजलं. त्या ट्विटमध्ये जॉनने त्याच्या नावासोबत त्याची NRI गर्लफ्रेंड प्रिया हिचे नाव दिले होते. एके रात्री मी जेव्हा ते ट्विट पाहिल, मला प्रचंड धक्का बसला. एका रात्रीत सगळं जगच बदललं. त्यानंतर बिपाशाचं जॉनशी कडाक्याचं भांडण झालं, वादही झाले आणि एका वाईट वळणावर येऊन दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले. 2011 साली त्यांच ब्रेकअप झालं.

बिपाशा-जॉनचे चित्रपट

2002 मध्ये जिस्म या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते, त्याच्या सेटवर जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांची भेट झाली. यानंतर ते मित्र बनले, प्रेमात पडले आणि नंतर एकत्र राहू लागले. ‘जिस्म’ (2003) व्यतिरिक्त बिपाशा आणि जॉन ‘ऐतबार’, ‘मधोशी’ आणि ‘विरुद्ध’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. ते दोघेही 2002 ते 2011 पर्यंत रिलेशनशिपमध्ये होते, त्यानंतर मात्र वेगळे झाले. ब्रेकअपमुळे मी आतून तुटले होते, पण मला माझं करिअर संपवायचं नव्हतं, म्हणून मी स्वतःवर नियंत्रण ठेवलं आणि मूव्ह ऑन केलं, असं बिपाशाने नमूद केलं होतं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी पहाटेच्या शपथविधीच्या आदल्या रात्री नेमकं काय घडलं? भुजबळांनी सांगितल्या पडद्या मागच्या घडामोडी
मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला...
हजामत महागली, सलूनवाल्यांनी किती वाढविले दर पाहा?
Kids Weight Management: ऐन तारुण्यात हृदयविकाराचा धोका का वाढतोय?; ही कारणं माहीत हवीच!
राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक – जयंत पाटील
मुख्यमंत्री पदापासून मंत्रीमंडळ विस्तार ते पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे गेम सुरू आहेत, संजय राऊत यांचा टोला
Kolkata Rape Case – प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणी संजय रॉयला जन्मठेप
उद्धव ठाकरेंचे शिलेदार नाराज, भूकंप अटळ? सर्वात मोठी बातमी समोर