‘…तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही,’पालकमंत्री पद न मिळाल्याने गोगावले संतापले
राज्यातील पालकमंत्री पदाचे वाटप एकदाचे झाले आहे. राज्यातील पालकमंत्री पदाचा तिडा एकदाचा सुटला आहे. रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने शिवसैनिकांला मोठा राडा केला आहे. भरत गोगावले यांना डावल्याने महाडमधील शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत. त्यांनी काल रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई- गोवा महामार्गावर उतरुन महामार्गा दोन तास रोखण्याचा प्रयत्न केला होता.
राज्यातील आमदारांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या पालक मंत्री पदाचे वाटप काल पूर्ण झाले आहे. या पालकमंत्री पदात मंत्री धनंजय मुंडे यांचा अपेक्षेप्रमाणे पत्ता कट झाला आहे.त्यात मंत्री भरतशेठ गोगावले यांना रायगडचे पालकमंत्री पद न मिळाल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत. गोगावले यांच्या नाराज झालेल्या शिवसैनिक कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून रात्री मोठा हंगामा केला आहे. या संदर्भात पोलिसांना हस्तक्षेप करुन महामार्गाची वाहतूक कोंडी दूर केली आहे. या संदर्भात आता भरतशेठ गोगावले यांचे कार्यकर्ते आता प्रचंड आक्रमक झाले असून मंत्री भरतशेठ गोगावले यांचे मंत्री झाल्यानंतर एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मिळालेला पदही काढून घेतल्याने ते प्रचंड नाराज झाले आहेत.
भरतशेठ गोगावले यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरविले आहे.काही वेळात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी भरतशेठ गोगावले संवाद साधून त्यांना शांत राहण्यास सांगणार आहेत. भरतशेठ गोगावले यांनी कार्यकर्त्यांना शांत राहाण्याची विनंती केली आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडणार याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. आपण वरिष्ठांसोबत चर्चा करून मार्ग काढू. कुणीही इतकी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही माझ्यासाठी जो निर्णय घेताय तो चुकीचा ठरु नये. राजकारणात वर खाली होऊ शकतं. भावना व्यक्त करा, मात्र शासनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असेही गोगावले यांनी कार्यकर्त्यांना समजवले आहे.
भरतशेठला फसवण्याचा प्रयत्न केला तर..
तुम्हा सर्वांना खात्री होती आपला माणूस पालकमंत्री होईल. आपण लढणारे आहोत रडणारे कार्यकर्ते नाही. आपण शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. कशामुळे अस घडलं यांचा तपास करू. पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सगळ्या गोष्टी दाखवून होत नसतात. असे नको व्हायला भरतशेठला पालकमंत्री पद भेटलं नाही तरी तो डगमगणार नाही.कोणीही भडकावून भाषण करू नका. भरतशेठला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा आणि सबुरी ठेवा,ईश्वर के घर देर हे अंधेर नहीं असेही भरतशेठ गोगावले यांनी म्हटले आहे.
निर्णय धक्कादायक आहे
आपली वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. फोन केला होता. पण निर्णय धक्कादायक आहे. आम्हाला अपेक्षा नव्हती. आमच्या सहाही आमदारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केली होती. पालकमंत्री पद आम्हालाच मिळणार म्हणून जिल्ह्यात संपूर्ण वातावरण झालं होतं. भरतशेठच पालकमंत्री व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. हा निर्णय मनाला पटणारा नाही. अनपेक्षित आहे. पण एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य करावे लागेल. त्यांच्या मनातील ते सांगतील असे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List