जगभरातून महत्त्वाच्या बातम्या
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ला 2.25 कोटींची ओपनिंग
कंगना रनौत हिचा बहुचर्चित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी पाठ फिरवल्याचे दिसले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 2.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी देशभरातील तिकिटाचे दर केवळ 99 रुपये ठेवण्यात आले आहेत. हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कथेवर आधारित आहे.
लॉरेन पॉवेल परतल्या
महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या ऍपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल या अचानक परतल्या आहेत. महाकुंभमध्ये त्या एकूण तीन दिवस होत्या. प्रयागराज येथून त्या भूतान दौऱ्यावर गेल्या असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या या दौऱ्याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती.
मस्क यांना महाकुंभचे निमंत्रण
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांना निमंत्रण देण्यात आले आहे. महाकुंभमध्ये येण्याचे अनेक मोठ-मोठय़ा पाहुण्यांना निमंत्रण मिळाले आहेत. या यादीत टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचाही समावेश आहे. याचा खुलासा प्रसिद्ध लेखक अमिश त्रिपाठी यांनी केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List