पवार कुटुंबात अंतिम शब्द कोणाचा? शरद पवार नाही तर सुप्रिया सुळेंनी सांगितलं या व्यक्तीचं नाव
निवृत्ती बाबर, प्रतिनिधी : मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 15 व्या राज्यस्थरीय शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिक्षण परिषदेमध्ये बोलताना सुप्रिया सुळे यांनी शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित केले, तसेच त्यांच्या खास शैलीमध्ये जोरदार फटकेबाजी केल्याचं देखील पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
शिक्षणाच्या बाबतीत अनेक बदल होतात आणि त्यावर चर्चा देखील होत आहे. प्रकाशजी जावडेकर आणि माझे मतभेद आहेत, परंतु शिक्षण क्षेत्राशी संबंधी आमचं एक मत आहे. मराठी भाषेवर आपण प्रेम केलं पाहिजे, हे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आर आर पाटील सोडले तर राजकारणात कोणत्याही नेत्याची मुलं सरकारी शाळेत गेलेली नाहीयेत, मी पण मराठी शाळेत गेले नाही, पवार कुटुंबात कॉन्व्हेंटमध्ये जाणारं पहिलं मूल म्हणजे मी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझ्या वडिलांना फार वाटत होतं की, मी मराठी शाळेत शिकावं परंतु आईच्या आग्रहामुळे मी कॉन्व्हेंट मध्ये शिकले. घरात बऱ्याच गोष्टींमध्ये आईचं चालतं तो भाग वेगळा. बाहेर ते शरद पवार आहेत, पण घरात ते नवरा आहेत आता याची हेडलाईन करू नका नाहीतर घरी जाऊन मला जोडे बसतील, अशी मिष्कील टिपणीही यावेळी सुप्रिया सुळे यांनी केली.
यशस्वी झाल्यावर नापास झालेल्या मुलांची कथा फार चांगली वाटते. कुठलंही मूल धन असतं या मताची मी आहे. मला दोन मुलं आहेत ते वाढवताना एवढा त्रास होतो परंतु शिक्षक चाळीस मुलांना सांभाळतात. त्या मुलांची आयक्यू लेव्हल वेगवेगळी असते, तरीही ते त्यांना सांभाळतात हे विशेष. तंत्रज्ञान येतं ते आत्मसात करावं या मताची मी आहे, मला पण आवडतं परंतु पहिल्यांदा मला तंत्रज्ञानाची भीती वाटत होती. चॅट जीपीटीची भीती वाटते, जीपीटीच्या माध्यमातून पोर गृहपाठ करायला लागली तर मेंदूचं आकलन कसं होईल हा खूप गंभीर विषय आहे, तंत्रज्ञानामुळे केवळ शिक्षकांची नोकरी जाणार नाही, कारण शिक्षक ही नोकरी नाहीये तर ती सेवा आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List