Farmer Loan Waiver : लाडक्या बहि‍णीने शेतकर्‍यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला

Farmer Loan Waiver : लाडक्या बहि‍णीने शेतकर्‍यांचा घास हिरावला; कर्जमाफीचा फैसला केव्हा? का ठरणार निवडणुकीचा जुमला

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकर्‍यांचा घास हिरावला. विधानसभा निवडणुकीवेळी लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्षे सुरू राहील असे आश्वासन देण्यात आले. डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा झाला आहे. पण त्यातच राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे समोर येत आहे. कॅगने राज्य सरकारच्या आर्थिक धोरणांवर ताशेरे ओढले आहे. तिजोरीवर आर्थिक बोजा वाढला आहे. राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर गेल्याचे समोर आले. तर आता शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा प्रश्न लाबणीवर पडला आहे.

राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर

राज्यातील राजकोषीय तूट 2 लाख कोटींवर गेला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या वित्त विभागाने राज्याच्या आर्थिक स्थितीवर बोट ठेवले होते. लाडकी बहीण योजनेसाठी त्यावेळी निधीची भार नको, असे मत विभागाने नोंदवले होते. आता कॅगच्या अहवालात राज्य सरकारच्या जमा आणि खर्चात ताळमेळ नसल्याचे म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊ, असे आश्वासन महायुतीने दिले होते. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कबुली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर 4-6 महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निर्णय घेईल, असे कोकाटे म्हणाले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा निर्णय आता लटकला आहे.

निवडणुकीत लाडक्या बहिणींने महायुतीला भरभरून मतदान केले. आता या योजनेचे निकष बदलण्याची वक्तव्य सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात येत आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तदोन योजनांचा लाडक्या बहिणीला लाभ न देण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी महासन्मान अथवा लाडकी बहीण यापैकी कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचे ते बहि‍णींनी ठरवावे असे वक्तव्य त्यांनी केले.

सूक्ष्म सिंचन योजनेचा निधी केव्हा?

सूक्ष्म सिंचन योजनेत निधीचा दुष्काळ दिसून आला. राज्यातील पावणेदोन लाखाहून अधिक शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत. प्रति थेंब, अधिक पीक या सूक्ष्म सिंचन लाभापासून राज्यातील पावणेदोन लाखाहून अधिक शेतकर्‍यांना निधीची प्रतिक्षा आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडे 2023-24 या वर्षातील 716 कोटींचे अनुदान रखडले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला बेस्टची धडक, सुदैवाने बचावले
शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कारला आज दुपारी खेड गल्ली येथे बेस्ट बसने धडक दिली. मात्र आमदार शिंदे काही क्षणांपूर्वीच...
अपुऱ्या सुविधांमुळेच मुलींची शाळेला दांडी, सुलभ स्वच्छता मिशन फाऊंडेशनचा चिंताजनक अहवाल
शमीचे पुनरागमन, बुमराही खेळणार, सिराज बाहेर!
जोगेश्वरीतील पाणीटंचाईवर लवकरच तोडगा; पालिका आयुक्त बोलवणार बैठक, शिवसेनेच्या मागणीला यश
सातासमुद्रापार घुमणार ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा, लिव्हरपूल येथे दणक्यात साजरी होणार शिवजयंती
केईएमच्या शतक महोत्सवाचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नोकरीतला वारसा हक्क कायम, कामगारांचा भव्य विजयी मेळावा