आरोपी जेहच्या बेडजवळ आला आणि…, मदतनीस एलियामाचा जबाब, धक्कादायक माहिती समोर
एलियामा फिलिप्स यांनी दिलेल्या जबाबानंतर सैफ – करीना यांचा लहान मुलगा जेह अली खान हल्लेखोराच्या निशाणाच्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. एलियामा फिलिप्स यांनी जेहच्या खोलीत हल्लेखोराला पाहिलं होतं. दरम्यान एलियामा फिलिप्स यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
एलियामा फिलिप्स म्हणाल्या, ‘मी आणि जुनू बुधवारी रात्री जवळपास 11 वाजता जेह याला झोपवत होतो. रात्री 2 वाजेच्या सुमार, फिलिप्स यांना जाग आली. तेव्हा बाथरुममधील लाईट चालू होती आणि दरवाजा थोडा उघडलेला होता. रात्री करीना मुलाला पाहण्यासाठी आली असेल असं फिलिप्स यांना वाटलं. पण काहीतरी संशयास्पद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
पुढे फिलिप्स म्हणाल्या, ‘मी त्याला पाहिलं तो हल्लेखोर बाथरुममधून निघून जेहच्या बेड जवळ जात होता. मी पाहण्यासाठी उठली कोण आहे. तेव्हा मी पाहिलं एक सडपातळ पुरुष जेहच्या बेडकडे जात आहे. मी तात्काळ उभी राहिली आणि जेहला उठवण्याचा प्रयत्न केला.’
‘त्या माणसाच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात चाकू होता. मी उठल्याबरोबर तो माझ्याकडे धावत आला. हाणामारीत त्याने माझ्या हातावर चाकूने वार केला. मी जेव्हा त्याला विचारलं तुला काय हवं आहे. तेव्हा त्याने माझ्याकडे 1 कोटी रुपयांची मागणी केली…’ एलियामा फिलिप्स यांच्या जबाबानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
एलियामा फिलिप्स यांच्या जबाबानंतर हल्लेखोर मुलाचा ताबा घेऊन पैशांची मागणी करणार होता… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही आणि त्याची पोलीस चौकशी होत नाही तोपर्यंत आरोपीचा नक्की उद्देश काय होता कळू शकणार नाही. याच अनुषंगाने आता तपास सुरु आहे. जोपर्यंत पोलीस चौकशीतून चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहेत.. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
काय म्हणाली करीना?
जबाबात करीना म्हणाली, हल्लेखोरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही संपूर्ण खान कुटुंब 12 व्या मजल्यावर पोहोचलो…’ हल्लेखोराने 11 व्या मजल्यावर हल्ला केला. घरात दागिने समोरच ठेवलेले होते. पण हल्लेखोराने दागिन्यांना हात देखील लावला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List