सैफ अली खानच्या ऑपरेशसाठी लाखोंचा खर्च, विमा कंपनीकडे कॅशलेस उपचाराची मागणी, रक्कम अखेर समोर
Saif Ali khan Operation Bills: अभिनेता सैफ अली खान मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल आहे. एका हल्लेखोराने अभित्यानेवर चाकूने सहा वार केले आहे. हाणामारीमध्ये अभिनेत्यावर झालेले दोन वार गंभीर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. सैफच्या मणक्यात हल्लेखोराने वार केल्यानंतर चाकूचा 2.5 इंचचा तुकडा त्याच्या शरीरात राहिला. अशात शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी चाकूचा तुकडा काढला आहे. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सैफ सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे. हल्ल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेसाठी सैफला मोठी किंमत मोजावी लगणार आहे. रुग्णालयाचं बिल देखील समोर आलं आहे. अभिनेत्याने आरोग्य विम्याच्या माध्यमातून कॅशलेस उपचार केल्याची माहिती देखील समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारी रोजी कॅशलेस उपचारासाठी विमा कंपनीशी खान कुटुंबियांचं बोलणं झालं होतं. अभिनेत्याला शस्त्रक्रियेसाठी एका रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. रिपोर्टनुसार, 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत सैफवर उपचार होणार आहे. 5 दिवस अभिनेता रुग्णालयात राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रिपोर्टनुसार, सैफ अली खानच्या उपचारासाठी 35 लाख 98 लाख 700 रुपये खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील 25 लाख रुपये विमा कंपनीने मंजूर केले आहे. तर राहिलेला खर्च खुद्द सैफ अली खान याला स्वखर्चातून करावा लागणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले डॉ. नितिन डांगे?
लिलावती रुग्णालयाचे डॉ. नितिन नारायण डांगे शुक्रवारी म्हणाले, ‘सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर आहे. आता तो चालू देखील शकतो. कोणतीच अडचण नाही शिवाय अभिनेत्याला जास्त वेदना देखील होत नाही…’ अभिनेत्याला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे.
अभिनेत्याला आयसीयू मधून नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सैफच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन त्याला रुग्णालयातून सुट्टी मिळेल असं देखील सांगण्यात येत आहे. पण अभिनेत्याल दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List